सी. पी. अँड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रवीनगर, येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची शाळेला भेट_

168

सी.पी. अँड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रवी नगर, येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक जी. जे. खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक ए. वाय. गोखले, हवालदार एन. बी. मुंडे, शिपाई ए. ए. वाघये, ऐ. यु. पवार, ए.टी. शेख, के. वी. बाणेवार यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांना मानवी, नैसर्गिक व जैविक आपत्ती बद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी या दलात सहभागी होऊन देशाची सेवा करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री रंदई सर यांनी केले.