राष्ट्रीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धेत बीकेसीपी शाळेच्या तीन विद्यार्थीनी खेडाळुची निवड

155

कन्हान : – स्कूल गेम फेडरेशन ऑफ़ इंडिया रायपुर (छत्तीसगढ़) यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या तीन विद्यार्थींनी खेडाळुची निवड झाली असुन खेडाळु राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व्दारे पारशिवनी तालुक्यातील बीकेसीपी शाळा कन्हान च्या तीन गुणवान खेळाडुंची ६८ वी राष्ट्रीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धेत निवड झालेली असुन (दि.०२ ते ०६) जानेवारी २०२५ या कालावधीत समता कॉलोनी प्रगति कॉलेज रायपुर (छत्तीसगढ़) येथे होणा-या कुराश स्पर्धेत बीकेसीपी शाळा कन्हान च्या गुणवान खेळाडुं कु. अनन्या मंगर, कु. आयुषी ठाकरे, कु. वैष्णवी कोतपल्लीवार हयानी नामांकन मिळवुन हे सर्व खेळाडु बीकेसीपी शाळेचे शारीरिक शिक्षक, मार्गदर्शक श्री अमित राजेंद्र ठाकुर सर यांचे सह राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धा २०२४-२५ करिता रायपुर (छत्तीसगढ़) येथे पोहचुन सहभागी झाले आहे. बीके सीपी शाळेचे अध्यक्ष श्री राजीव खंडेलवाल सर, सचिव पुष्पा गैरोला, मुख्याध्यापिका कविता नाथ, सर्व अधिकारी व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी खेळाडुं चे मनःपूर्वक अभिनंदन करून यशस्विते करिता शुभेच्छा दिल्या आहे.