प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथ. शाळेत सांस्कृतिक महोत्सव साजरा.
मूल(प्रति)
दि.२.०२.२०२६ रोज सोमवारला सौ. लक्ष्मी येनप्रेडीवार शिक्षण संस्था द्वारा संचालीत प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथ. शाळा मुल येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सत्कारमूर्ती मा. सौ. एकताताई प्रशांत समर्थ नगराध्यक्षा मुल यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच सत्कारमुर्ती मा. प्रशांतभाऊ विलासराव समर्थ बांधकाम समिती नगर परिषद मुल कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा कवडूजी येनप्रेहीवार सौ लक्ष्मीयेनप्रेड्डीवार शिक्षण संस्था सचिव व मुल तालुका युवक बिरादरी संघटना संस्थापक अध्यक्ष तथाविदर्भ लोक आंदोलन समितिचे अधक्ष विशेष अतिथी म्हणून मा जयश्रीताई गुज्जनवार
गटशिक्षणाधिकारी मूल मा. नितिनजी गहेवार नगरसेवक नगपरिषद मुल मा. नितेश येनप्रेोवार
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. नितेशजी गरेवार जिल्हा उपाध्यक्ष कांग्रेस कमीटी
गडचिरोली मा. सुनिलराव बल्लमवार से. नि. प्राचार्य विश्वशांती मारोडा मा. संदिपभाऊ निकुरे,
शाळा समीती उपाध्यक्ष मा विनायकजी रेकलवार पत्रकार मा नरेशजी संगिडवार प्रतिष्ठीत
व्यापारी मा सुभाषराव चन्नावार प्राचार्य राजगड मा. अरुणानी येनप्रेडीवार शाळा समिती
संचालक प्रि.ई.गां.प्रा. शाळा मूल मा. अमोलजी बच्चुवार प्रतिष्ठित व्यापारी मा. मुकेशजी
मॅकलवार स. शि. राजगड मा. सुधिरजी सहारे सामाजिक कार्यकर्ता प्रमुख पाहुणे म्हणून मा.
माधुरीताई पोरेड्डीवार स. शि. बोरचांदली मा. वर्षांताई संगीडवार स. शिक्षीका बेंबाळ मा.लखीताई
गणविर माता पालक अध्यक्षा कु.गणेशजी नरुले प्रमुख पालक कु. मनिषाताई बोडे. शालेय
व्यवसाय समिती सदस्य कु. ओमदेवजी मोहुले सामाजिक कार्यकर्त्या मा. मीनानाथजी शेंद्रे, मा.
रुपालीताई रोहणकर माता पालक उपाध्यक्षा मा. रुषीनाथजी पाल शाळा व्यवस्थापन समिती
सदस्य कु.माधुरीताई गुरनुले, कु. पद्मावती उके शाळा. व्य.स. समितीचे सदस्य, मा. किशोरजी
वरखडे, मा. विजयजी शेरकी मा.प्रवीणजी नरुले, मा.सुनीलजी बट्टे, मा. शंकरजी नवघडे
प्रतिष्ठित व्यापारी, हे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गिते व लोकनृत्य, सामुहिक नृत्य, आदिवाशी नृत्य, कोळी नृत्य, लावणी सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली चिमुकल्या विद्याथ्यांना टाळ्याच्या गजरातून कौतुक केले. या कार्यक्रमातून भारतिय संस्कृतीची परंपरा सामाजिक मुल्यांचे प्रदर्शन प्रभावीपणे दर्शनघडले. यावेळी मा. प्रशांतभाऊ विलास समर्थ बाधकाम सभापती, मा. जयश्रीताई गुज्जनवार गटशिक्षणाधिकारी मूल मा. विनायकजी रेकलवार मा कवडुजी येनप्रेडोवार संस्था सचिव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सोनु येनप्रेड्डीवार स. शि. यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन सुकेशिनी रामटेके मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










