महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका उपाध्यक्षपदी प्रकाश चलाख यांची निवड.
मूल(प्रति)
मुल येथील पत्रकार प्रकाश चलाख यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा मुल तालुका उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रकाश चलाख गेल्या कित्येक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. पत्रकारिता क्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख असून समाजातील प्रत्येक घटकाला, वंचितांना लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. प्रकाश चलाख उच्चविद्या विभूषित असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तालुका शाखा मूल उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याने मित्र, पत्रकार बंधू व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.










