आमटे फार्म (सोमनाथ) येथे वाघाचा हल्ला; महिला ठार.

16

आमटे फार्म (सोमनाथ) येथे वाघाचा हल्ला; महिला ठार.

मूल (प्रति)

सोमनाथ येथील आमटे फार्ममध्ये कापूस तोडण्यासाठी गेलेल्या मारोडा येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना आज घडली. सुनीता शामराव भोयर (वय ४५, रा. मारोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

सुनीता शामराव भोयर ही महिला सकाळी इतर मजुरांसह शेतात कापूस तोडण्यासाठी गेली होती. शेताच्या कडेला असलेल्या झुडपातून अचानक वाघाने हल्ला केला. इतर मजुरांनी आरडाओरडा केल्यावर वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला; मात्र तोपर्यंत सुनीता भोयर यांचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वनविभागाकडे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

मृत महिलेच्या पश्चात आई, वडील आणि कुटुंबीय असा परिवार आहे. शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.