अवकाळी पाऊस मदत निधी.
अर्धे शेतकरी प्रतिक्षेतच.
मूल(प्रति)
कालपासून मूल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणे सुरुवात झाले आहे. परंतु यादीतील बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही पैसे जमा न झाल्याने परत शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
तालुक्यात खरीप हंगाम (2024) मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना आधार प्रमाणीकरण (ई_ केवायसी) करण्यास तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले. बराच संघर्ष केल्यानंतर शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून पैसे मिळण्यास सुरुवात झाले.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
“मागील काही वर्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीतील काही शेतकऱ्यांना डावलण्यात आले आणि निवडक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आल्याने तीच पुनरावृत्ती यावेळेस तर होणार नाही ना अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.”
परंतु नुकसानग्रस्त यादीतील बरेच शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून यादीतील सर्व लाभार्थ्यांना अवकाळी पाऊस मदत निधी देण्याची पारदर्शक कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.










