नवनाथ आश्रम तेलनगखेड़ी तह सावनेर या तीर्थक्षेत्रला के दर्जा मिळावा

29

मौदा/सावन तेलनगखेडी गावापासून 2 की मी अंतरावर कोलार जलाशयाच्या काठावर 25 वर्षांपूर्वी नवनाथ आश्रमाची स्थापना करण्यात आली होती आज या ठिकाणी विविध मंदिर स्थापन करण्यात आले आहे या ठिकाणी दत्तजयंती ,महाशिवरात्री, वरूथनी एकादशी, गजानन महाराज प्रकट दिन या दिवशी मोठी यात्रा भरते या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येत असतात तसेच दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे परंतु तेलनगखेडी गावापासून आश्रम पर्यंत असलेला रस्ता अतिशय खराब असल्याने भाविकांना ये जा करण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागतो ही समस्या लक्षात घेता नवनाथ आश्रमाला क तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा तसेच गावापासून ते आश्रम पर्यंत सिमेंट रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तेलनगखेडी येथील नागरिकांनी सावनेर क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख यांचेकडे केली आहे.