एनसीसी प्रशिक्षण केंद्रात परेड दरम्यान शिक्षकाला भुवड ऐऊन पडल्याने मृत्यू.

765

कामठी-जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील एनसीसी (छात्रसेना) शिक्षकांच्या प्रशिक्षण केंद्रात ला सकाळी सहा वाजता सुमारास परेड करताना प्रशिक्षणार्थी शिक्षकाला भुवड येऊन पडल्याने दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सहा वाजता सुमारास घडली असून गणेश भामट्या कोकणी वय 49 वर्ष राहणार प्पगरम पोस्ट रायगन जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र असे आहेत ,

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीसी (छात्र सेना) प्रशिक्षणार्थी शिक्षक गणेश भामय्या कोकणी वय 49 वर्ष राहणार नंदुरबार महाराष्ट्र हा गेल्या दोन महिन्यापासून कामठी कंटोन्मेंट येथील एनसीसी (छात्र सेना) प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण घेत होता प्रतिदिन नुसार सकाळी सहा वाजता सुमारास पीटी व परेड करिता ग्राउंडवर गेला सहकार्यासह परेड करीत असताना त्याला भो़पळ येऊन पडला उपस्थित अधिकारी व सहकाऱ्यांनी त्याला मिलेट्री रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता उपचारादरम्यान आठ वाजता सुमारास मरण पावला मृत देहावर कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले ,एनसीसी प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुनी कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.