परभणी येथे झालेल्या घटनेचा महादुला येथे निषेध

64

कोराडी – परभणी येथे मनुवादी प्रवूत्तीच्या माथेफिरूने प्रतिकाच्या स्वरूपात असलेल्या भारतीय संविधानाची तोडफोड केली त्या निषेधार्थ आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक महादुला येथे माजी नगरसेवक रत्नदिपभाऊ रंगारी यांच्या नेतृत्वाखाली नारे निदर्शने करण्यात आले. यावेळी कोराडी चे पोलिस निरीक्षक पांडे साहेब यांना आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती सचिनजी मानवटकर, संजय रामटेके, संतोष बोरकर, प्रविण उगले, ललित पाटील, विलास बचाटे, मनिष वासनिक, विकास लझडे, प्रितम चौरे, गोल्डी वाघमारे, राहुल नितनवरे, कुलदीप सहारे, भरत खोब्रागडे , रितेश नागपुरे, रक्षित नितनवरे, तुषार छत्री, रोशन वर्मा, विक्की वाघमारे, अजय वैद्य, संजय खंडारे, सुनिल हनवंते, राजु कांबळे, प्रकाश लांडगे, सिध्दार्थ सोणवने, सागर वाल्टर, सक्षिक गजभिये आणि नागरीक उपस्थित होते.