शिवसेना महिला जिल्हा प्रमुख भारती राखडे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार.
मुल (प्रति)
समाजसेवेची आवड असणारे भारती राखडे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख चंद्रपूर तालूका मूल जिल्हा चंद्रपूर यांना नुकताच भारत सरकार आणि निती आयोग नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती ‘तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२६ मिळाला आहे. याचबरोबर ग्राहक रक्षक समितीच्या चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडावी म्हणून यांची ग्राहक रक्षक समिती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे.
हि निवड ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सौ. आशाताई पाटील नाशिक यांनी केली असून तशा प्रकारचे निवड पत्र भारती राखडे यांना प्राप्त झाले आहे. त्यांना हा सन्मान दि.०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेलिब्रिटी हॉटेल अंध शाळा बस स्टॉप समर्थ बाजार जवळ नाशिक रोड नाशिक येथे देण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात मा. श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक, सौ, सीमाताई महेश हिरे आमदार,सौ. देवयानीताई फरांदे आमदार, कल्याणराव पाटील आमदार, मनोरमा पाटील समाजसेविका, संदीप सोनवणे कडकनाथ ऍग्रो वर्ल्ड संस्थापक,अजय बोरस्ते शिवसेना उपनेता नगरसेवक,सुधीर तांबे माजी विधानपरिषद सदस्य, महेश चौधरी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त नाशिक, मंदाकिनी भोसले ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष नाशिक,अनिल गिरनारे वैध मापन शास्त्र, उपनिबंधक नाशिक, डॉ यु. के.शर्मा पर्यावरण तज्ञ या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुल तालुक्यातील अनेक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










