शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी.
विविध उपक्रमाद्वारे गावात सामाजिक एकतेचा संदेश.
मुल (प्रती)
शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ०३ जानेवारी रोजी चिचाळा गावात विविध समाजोपयोगी व प्रबोधनात्मक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शिक्षण, स्त्री–पुरुष समानता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांचा संदेश देणारा ठरला. प्रविण बोबाटे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाने गावातील नागरिकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव, प्रेरणा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव दिली.
मुल तालुक्यातील चिचाळा येथे सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त उमेद अभियानातील सर्व महिला व ग्रामसखी सहभागी होत्या.गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण बोबाटे यांच्या पुढाकाराने ECG व डोळे तपासणी शिबीर, रक्तदान व समाजप्रबोधन उपक्रम यशस्वीपणे पार पडले. तसेच गावस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिक्षण, स्त्री–पुरुष समानता, सामाजिक न्याय व अंधश्रद्धा निर्मूलन यावर प्रभावी विचार मांडून संपूर्ण गावात सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला.
“जयंतीनिमित्त आरोग्य उपकेंद् चिचाळा येथील कर्मचाऱ्यांनी शिबिरात सहभाग नोंदविला.आरोग्य तपासणी, डोळे तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. ECG तपासणीत गावातील नागरिकांचे हृदयाचे आरोग्य तपासले गेले, अनेकांनी डोळ्यांची तपासणी करून दृष्टीसंबंधित आरोग्याबाबत जागरूकता व्यक्त केली, तर अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली. या उपक्रमामुळे आरोग्य व समाजोपयोगी कार्यात नागरिकांची सक्रियता दिसून आली.”
गावात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये “शिक्षण हाच खरा शस्त्र”, “स्त्री–पुरुष समानता”, “अंधश्रद्धा निर्मूलन”, “शिक्षणातूनच समाजपरिवर्तन” अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. रॅलीमुळे सावित्रीमाई फुले यांचे विचार गावकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला.सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य साधून गावस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षण, सामाजिक समता, महिलांचे अधिकार, अंधश्रद्धा निर्मूलन, आणि सामाजिक सुधारणा यांसारख्या विषयांवर प्रभावी विचार मांडले. उत्कृष्ट वक्त्यांना रेंजर सायकल, घड्याळ, पेन व पुस्तके बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात आली.
संध्याकाळी पार पडलेल्या समाजप्रबोधन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंदुभाऊ मारगोनवार, अखिलभाऊ गांगरेडीवार, संदिपभाऊ आगडे, पलिंदर सातपुते, संजयभाऊ येनूरकर, राहुल निमगडे, गुरूदासजी भेंडारे, पूजाताई डोहने, रमेश सावकार येलकिंवार, मुख्याध्यापक भीमराव रामटेके , सुनील खंडाळे सर व जीवनदास चलाख, देवनाथ कोहळे उपस्थित होते. मान्यवरांनी सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षण व सामाजिक कार्याचा गौरव करत आजच्या काळात त्यांच्या विचारांची गरज अधिक असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास सौ. जस्मिताताई लेनगुरे, सरपंच सदस्य सौरभ इटकलवार, पोलीस पाटील विजयकुमार दुर्गे , तंटामुक्ती अध्यक्ष संजय गेडाम, उमेद गटाच्या महिला ज्योतीताई आंबोरकर, सारिकाताई रेड्डीवार, वर्षा एडणूतलवार, मीनाक्षी बुरांडे, ललिता सोमनकर, सोनी लेनगुरे, शिक्षिका ललिता भेंडारे यांच्यासह उमेद अभियानातील सर्व ग्रामसखी तसेच उमेद अभियानातील सर्व महिलांची उपस्थिती होती. गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपक्रमांचे आयोजन प्रविण बोबाटे, सुरज टिकले, यश लेनगुरे, राज बोपावार, मुकेश गांडलेवार, बळवंत चलाख, ज्ञानेश्वर गुरनुले, भाऊरावजी बालगेवार, विशाल गांडलेवार, रुपेश चलाख, राजू गुरनुले, संदेश निमगडे, शुभम निमगडे यांनी केले. त्यांच्या पुढाकारामुळे चिचाळा गावात सावित्रीमाई फुले जयंती अत्यंत अर्थपूर्ण, सामाजिक जाणीव जागवणाऱ्या व प्रेरणादायी स्वरूपात साजरी झाली.










