बिडगाव नगर पंचायत चे 5200 मतदारांवर घेतलेल्या आक्षेपा विरोधात भाजप चे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

47

कामठी ता प्र 13:-कामठी तालुक्यातील बिडगाव नगर पंचायत अंतर्गत मतदार यादीतील अंदाजे 5200 मतदारांवर काही विरोधी पक्षातील लोकांनी आक्षेप घेतला असून ते मतदार बिडगाव,तरोडी(खु),प्रधानमंत्री आवास योजना 62.63 येथे 80 टक्के मतदार वास्तव्यास आहेत .तेव्हा अशा नागरिकांना मतदाना पासून वंचीत न ठेवता मतदार यादीतील नावे वगळण्याची कार्यवाही थांबविन्यात यावी व चुकीचे आक्षेप घालून मतदाणा पासून वंचीत ठेवण्याचा प्रकार घालनाऱ्या त्या आक्षेप करनाऱ्यावर कायदेशीर कारवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज भाजप तर्फे भाजप पदाधिकारी अनिल निधान व भाजप कामठी तालुका ग्रा अध्यक्ष सचिन घोडमारे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सह हजारो मतदारांच्या संख्येतील नागरिकांनी 12 ऑगस्ट ला दुपारी12 वाजता कामठी तहसील कार्यालय वर धडक मोर्चा नेत नारेबाजी करण्यात आली.

याप्रसंगी भाजप पदाधिकारी रमेश चिटके, माजी सरपंच निकेश कातुरे,संतोष तिजारे किशोर बेले, माजी सरपंच प्रांजल वाघ,पायल पटले, वंदशीला अंबुले,गायत्री कटरे, ललिता विश्वकर्मा,
रत्नप्रभा घटले, वंश ठाकरे,शशी सनोडिया,बलराम सनोडिया आदी उपस्थित होते.