पत्रकार देवर्षी जयंती नारद पत्रकार सन्मान सोहळा

56

रामटेक विभागाचा यंदाचा विश्व संवाद केंद्र द्वारे आयोजित आद्य पत्रकार देवर्षी जयंती नारद पत्रकार सन्मान सोहळा दिनांक १७/०८/२०२५ ला रामजी महाजन देशमुख शाळा रामटेक येथे संपन्न झाला. या समारंभात व्यापीठावर प्रमुख अतिथी सौ शिल्पा ढोमणे, प्रमुख वक्ता प्रसादजी बर्वे, विभाग प्रचार प्रमुख सौगत नंदी उपस्थित होते. रामटेक प्रचार प्रमुख अजिंक्य खरवडे आणि रामटेक जिल्हा कार्यवाह सुनीलजी नारणवरे ही सुद्धह कार्यक्रमात पूर्णवेळ उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ता म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रसादजी बर्वे म्हणाले, पौराणिक कथांमध्ये आणि शास्त्रामध्ये  नारदांचे कार्य ही अतुलनीय आहे. तसेच मागील दशकातील भारताची प्रगती पाहता ब्रिटिश मानसिकतेचा अंत झाला आहे असे दिसून येते. परंतु भारताची मूळ संस्कृती, परंपरा, विचारधन नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयत्न होतो आहे, अशी चिंता पण त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात मुख्य अतिथि म्हणून लेखिका सौ. शिल्पाजी ढोमणे हे उपस्थित होते. यांनी प्रत्येक पत्रकार यात एक लेखक दडलेला असतोच आणि तो समजपरिवर्तनासाठी सतत कार्यरत असतो असे विचार मांडले.

या वर्षीचा देवर्षी नारद सन्मान रामटेकचे राजूजी कापसे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. कार्यक्रमाला मान्यवर पत्रकार व समाजातील प्रबुद्धजन  तसेच तरुण वृंद बहुसंख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक अजिंक्य खरवडे  यांनी केले तर आभार प्रदर्शन सौगत नंदी यांनी केले.