दिव्यांग लाभार्थ्यांनी वाढीव मासिक मानधनाचा लाभ घ्यावा.
विहित कालावधीत कागदपत्र सादर करण्याचे आवाहन.
मुल(प्रति)
तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना संदर्भीय शासन, निर्णय क्र.01 अन्वये मासिक मानधन 2500/-रु देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार ज्या दिव्यांग लाभार्थ्याकडे यु.डी. आय. डी. कार्ड व वैध प्रमाणपत्र असेल तरच त्यांची माहिती पोर्टलवर अद्यावत करून लाभ देण्यात यावा व ज्या लाभार्थ्याकडे यु. डी. आय. डी. कार्ड व वैध प्रमाणपत्र नसल्यास लाभ बंद करण्यात यावा असे निर्देश संदर्भिय क्र.02 अन्वये प्राप्त झालेले आहेत.
त्याअनुषंगाने मुल तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना सुचना / आवाहन करण्यात येते की, दिव्यांग (अपंगत्व ) असल्याचे प्रमाणपत्र व यु. डी. आय. डी. कार्ड ची झेरॉक्स प्रत मोबाईल नंबरसह दिनांक 15/02/2026 पर्यत संबंधित ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांचेकडे तसेच तहसिल कार्यालय, मुल येथील संजय गांधी योजना शाखेत न चुकता सादर करावे.जेणेकरुन दिव्यांग लाभार्थ्यांना DBT पोर्टलव्दारे दिव्यांग बाबतची माहिती अपडेट करण्यात येऊन 2500/- रु मानधन जमा करण्यात येईल व योजनेचा लाभ सुरु राहील. तथापि, ज्या लाभार्थ्यांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र व यु. डी. आय. डी कार्ड विहित मुदतीचे आत सादर न केल्याने योजनेतुन नाव कमी करण्यात येऊन लाभ बंद करण्यात येईल. व सदरहू बाबीस आपणास जबाबदार धरण्यात येईल याची मुल तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी नोद घ्यावी असे प्रवीण चिडे, नायब तहसिलदार, (संगायो) तहसिल कार्यालय, मुल यांनी कळविले आहे.










