धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्याची मागणी.
मूल(प्रति)
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बोबाटे यांनी शासनाकडे केली आहे.
मागील हंगामात महाराष्ट्र शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२४-२५ साठी प्रति हेक्टरी २०,००० रुपयांचा बोनस जाहीर केला.
बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मागील वर्षी देण्यात आला.
किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी पात्र ठरवून सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला. चालू हंगामात शासनाचे आदेशानुसार शेतकऱ्यांनी बाजार समिती, महामंडळ कार्यालय येथे नोंदणी केली आहे. परंतु यावर्षीच्या हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून बोनस देण्याचे जाहीर केले नाही.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धान बोनस जाहीर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बोबाटे यांनी सरकारकडे केली आहे.










