शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस मदत निधी मिळणार !

23

शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस मदत निधी मिळणार !

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा.
मूल(प्रति)
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे धान पीक तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे करण्यात आले. तालुक्यातील सर्व आधार प्रमाणीकरण (इ_ केवायसी) केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरच अवकाळी पाऊस मदत निधी (पिक बुडी) मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
खरीप हंगाम (2024) वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेती तसेच शेतातील पिकांचे नुकसान झाले. शासनाने संबंधित विभागाला पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले. तालुकास्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले. तालुका प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना विहित कालावधीत (ई _केवायसी) करण्याचे सांगण्यात आले.
आधार प्रमाणीकरण करूनही शेतकऱ्यांना वेळेवर अवकाळी पाऊस मदत निधी मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना विनंती करून तात्काळ  अवकाळी पाऊस मदत निधी देण्याची विनंती केली. अनेकदा या संदर्भात शेतकऱ्यांकडून वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला.
परंतु अवकाळी पाऊस मदत निधी देण्यासंदर्भात शासनाकडून दिरंगाई होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुल  तालुक्यातील हळदी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अखेर माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे कडे तालुक्यातील हळदी येथील  शेतकऱ्यांनी आपली व्यथा सविस्तर सांगितली. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून प्रकरण गांभीर्याने घेतले.
माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी तात्काळ आधार प्रमाणिकरण (ई _केवायसी) केलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस मदत निधी देण्यासंदर्भात शासनाला विनंती करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला आहे.

लवकरच तालुक्यातील आधार प्रमाणीकरण केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस मदत निधीचे शासन स्तरावरून वितरण होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हळदी येथील शेतकऱ्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सरकारचे आभार मानले आहे.