कन्हान : – मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रा २०२५ ही सकाळी आगमन होताच कामठी, कन्हान, कांद्री, टेकाडी, वराडा व पारशिवनी शहरात आगमण होताच मराठा सेवा संघ, शिवप्रेमी समाज बांधवा व्दारे आम्हचे तुम्हचे नाते काय ? “जय जिजा ऊ ! जय शिवराय ! ” च्या घोषणेने जल्लौषात भव्य स्वागत करण्यात आले.

मराठा सेवा संघा द्वारे संपुर्ण महाराष्ट्रात जिजाऊ रथयात्रा संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतुन दि.१८ मार्च ला वेरूळ येथुन निघु न संपुर्ण महाराष्ट्रात फिरून १ मे महाराष्ट्र दिनी लाल महाल पुणे येथे पोहचेल व रथयात्रेचे समापन होईल. नागपूर जिल्ह्यात रथयात्रा १३ एप्रिल पोहचली नागपुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व अनेक गावातुन रथ यात्रा मार्गक्रमण करताना शहरात व ग्रामीण भागात रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. मधुकर मेहकरे, सौरभ खेडकर, प्रेमकुमार बोके, दिलीप चौधरी आदीनी जागो जागी रथयात्रेचे महत्त्व समजावुन सांगितले. शेतकरी, तरुण, महिला व विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर जागृती निर्माण करण्याकरिता रथयात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही रथयात्रा बहुजन व मराठा समाजाला एकत्र जोडण्याकरिता असुन, तोडणाऱ्या प्रवृत्तीला विरोध या यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले. जिजाऊ रथयात्रा समन्वयक अरविंद गावंडे, म.से.संघ महासचि व मधुकरराव मेहकरे, संभाजी ब्रिगेड महासचिव सौर भ खेडेकर, डॉ. गजानन पारधी यात्रे दरम्यान उपस्थित होते.

मराठा सेवा संघ लॉन नागपुर येथुन ऑटोमेटिव्ह चौक नागपुर ते नविन कामठी पोलीस स्टेशन सामोरू न शिवाजी चौक कामठी येथे सकाळी ९. ४५ वाजता शिवरायांना व जिजाऊ प्रतिमेस माल्यार्पण करून एक नाथ लांजेवार, मुकेश चकोले, आय रहमान सह नागरि कांनी स्वागत केले. जयस्तंभ चौकातुन महामार्गाने १० वाजता बावनकुळे यांचे घराजवळ मेन रोड कामठी येथे तेजस बहुउद्देशिय संस्थेचे चंद्रशेखर बावनकुळे, शाहिर राजेंद्र बावनकुळे मित्र परिवार व्दारे स्वागत करण्यात आले. तदंतर गांधी चौक कन्हान येथे १० .१५ वाजता कन्हान शहर विकास मंच व सकल हिंदु समाज व्दारे स्वागत करून थंड पेय वितरण करण्यात आले. १०.२५ वाजता विवेकानंद सेवा मंडळ चॅरिट्री ट्रस्ट व ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे स्वागत करून शरबत वितरण करण्यात आले. आंबेडकर चौकात डॉ. बाबा साहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पुढे यात्रेचे १०.३० वाजता छत्रपती शिवराय चौक तारसा रोड टी पॉंईट कन्हान येथे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड कन्हान व्दारे भव्य स्वागत व कॉनर सभा संपन्न घेत चिप्सचे पॉकिट व चाय वितर ण करण्यात आला. ११. वाजता कांद्री येथे चेतक पोटभरे मित्र परिवार व्दारे स्वागत करून थंड मठा वितरण करण्यात आला. ११.१० वाजता टेकाडी बस स्टाप येथे संभाजी ब्रिगेडचे सुरेश हुड मित्र परिवार व्दारे स्वागत करण्यात आले. ११.२० वाजता वराडा बस स्टाप ला वराडा सरपंच सुनिल जामदार, अमोल देऊळकर व्दारे स्वागत करून पुढे आमडी फाटा मार्गे पारशिवनी येथे गांधी चौकात बबनराव झाडे, जगदीश मोहोड, दिवाकर भोयर सह मराठा सेवा संघ व शिवप्रे मी व्दारे १२.१५ वाजता भव्य स्वागत व चाय नास्ता करून पुढे खापा मार्गे शिवतिर्थ येथे स्वागत, जेवण नंतर सावनेर, कळमेश्वर वरून काटोल ला सायंकाळी स्वागत, सभा होऊन पुढे रात्री कारंजा येथे मुक्काम.

नागपुर जिल्हयात जिजाऊ रथयात्रा यशस्विते करिता नागपुर जिल्हाध्यक्ष प्रशांत मोहोड, शहराध्यक्ष प्रमोद वैद्य, जिल्हा सचिव बाळनाथ मानकर, सचिव पंकज निंबाळकर, अंगद काळे, पुरूषोत्तम कडु, जिजा ऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष जया देशमुख, विभागीय अध्यक्ष सिमा टालाटुले, सुनिता जिचकार, जिल्हाध्यक्ष स्वाती शेंडे, नंदा देशमुख, प्रणाली दळवी, अनिता ठेंगरे, वैशाली कोहळे, अरूणा भोंडे, कन्हान अध्यक्ष मायाताई इंगोले, छायाताई नाईक, लता जळते, संभा जी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रताप पटले, ग्रामिण अध्यक्ष संजय कानतोडे, दिलीप खोडके, श्याम डहाके, शांतारा म जळते, मोतीराम रहाटे, ईश्वर डहाके, संदीप कुकडे, राकेश घोडमारे, सचिन साळवी, ऋषभ बावनकर, चेतक पोटभरे आदीं सह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमीनी सहकार्य केले.










