साई मंदीर इंदिरा नगर कन्हान येथे साई पालखी भ्रमण आणि महाप्रसाद

24
Oplus_131072
कन्हान : –  श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे साई मंदीर इंदिरा नगर कन्हान येथुन गुरूवार ला साई पालखी भ्रमण आणि शुक्रवार ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
       दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे गुरूवार (दि.२४) एप्रिल २०२४ सायंकाळी ६ वाजता साई मंदीर इंदिरा नगर कन्हान येथुन साई पालखी निघुन शहर भ्रमण करेल. आणि शुक्रवार (दि.२५) ला  सायंकाळी ६ ते १२ वाजे पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. करिता सर्व भाविक भक्तांनी या दोन्ही धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे करण्यात आले आहे.