अवैध रेतीची वाहतुकीचे ४ दहा चाकी ट्रक पकडले

21
Oplus_131072
  
कन्हान : – शहरातील जुने कन्हान पोलीस स्टेशन इमारतीच्या बाजुला राष्ट्रीय महामार्गावर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीसांनी संयुक्त नाकाबंदी करुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्या चार ट्रक ला पकडले. या कारवाईत पोलीसांनी कोट्यव ६धींचा मुद्देमाल जप्त करुन अवैध वाहतुक करणाऱ्यां विरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली आहे.
            प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.१९) एप्रिल ला रात्री ११ वाजता दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि स्थानिक पोलीस अवैध धंद्यावर कारवाई करण्यास परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमी मिळाली कि मनसर कडु न कन्हान कडे काही वाहन अवैध रेतीची वाहतुक करि त येत आहे. अश्या माहितीने उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड व पोलीस निरीक्षक राजें द्र पाटील आणि पोलीस कर्मऱ्यांनी जुने कन्हान पोली स स्टेशन इमारतीच्या बाजुला राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी केली असता चार संशयित ट्रक पोलीसांना आढळुन आले. पोलीसांनी ट्रक क्र.१) एमएच ४० सी टी ७७१७, २) एमएच ३६ एए ४०६१, ३) एमएच बी एफ ८१९१, ४) एमएच ३६ एए १५१८ ला थांबवुन पाहणी केली तर दहा चाकी ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणा त रेती दिसुन आली. पोलीसांनी ट्रक चालकांना रेती च्या राॅयल्टी विचारली असता त्यांचाकडे कोणतीही वैध कागदपत्रे दिसुन आले नाही. पोलीसांनी तात्काळ कारवाई करित ट्रक चालक आरोपी १) अक्षय रतेन्द्र कुमार नागेश्वर वय २९ वर्ष, राह. कौशल्यानगर पीली नदी नागपुर, २) नितिन अशोक नेवारे वय २७ राह. डोडमाझरी, आमगाव दिघोरी जि. भंडारा, ३) आकाश सुनिल कनोजे वय ३० वर्ष, ४) सुरेंद्र योगेश्वर ठाकरे वय २५ वर्ष दोघेही राह. कामठी यांना अटक करून दहा चाकी चार ट्रक किंमत ९९,००००० आणि २५ ब्रास रेती किंमत १,२५,००० असा एकुण १,००,२५, ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोली स अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.