क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतिकारी आहे- माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर

43

कामठी ता प्र 3:-आद्य शिक्षिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी व क्रांतिकारी आहे .सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सवित्रीमाईंचे प्रगतीशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हीच खरी काळाची गरज असल्याचे मौलिक प्रतिपादन माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
कामठी बस स्टँड जवळील पटेल न्यूज पेपर एजन्सी कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .याप्रसंगी समाजसेविका प्रतिमा भवसागर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांचा विजय असो असा जयघोषसुद्धा करण्यात आला .
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गुड्डू
मानवटकर, माजी नगरसेवक विकास रंगारी,दिपंकर गणवीर, कृष्णा पटेल,विजय जैस्वाल,
आशिष मेश्राम,आनंद गेडाम,राजन मेश्राम, सुमित गेडाम,गीतेश सुखदेवें,
सिद्धांत बागडे ,विलास वाघमारे ,
कोमल लेंढारे ,सलीम भाई,सलमान अब्बास, राकेश कनोजिया,
आनंद गेडाम, शेख सज्जाक ,
आसाराम हलमारे,धीरज गजभिये,गजेश पटेल, प्रवीण यादव, संदीप रामटेके, आदी उपस्थित होते