भीमा कोरेगाव शौर्य दिनी महार बटालियन व समता सैनिक दला तर्फे विनम्र अभिवादन 

20
  कन्हान : –  भीमा कोरेगाव विषमतेच्या विरुद्ध समता व समानता करिता पाचशे महार योद्धा वीरानी २८ हजार पेशवाई सैनिकाना पराजित केले होते. त्या शौर्य दिवसाच्या स्मरणार्थ आंबेडकर चौक कन्हान येथे महार बटालियन व समता सैनिक दला तर्फे पाचशे शुरवीरांना विनम्र अभिवादन करून श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
           बुधवार (दि.१) जानेवारी २०२४ ला डॉ बाबा साहेब आंबेडकर चौक कन्हान येथे सी एस लामा भन्ते यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य संचालन महार सैनिक जय पाटील यांच्या नेतुत्वात कन्हान, कामठी, नागपुर चे माजी महार सैनिकानी पाचशे शुर महार विरांना मान वंदना आणि सलामी देऊन विनम्र अभिवादन केले. तदंतर महार बटालियनच्या शूर महार सैनिकांनी परेड करून एक एकाने पुष्पचक्र भीमा कोरेगाव शौर्य स्तंभा च्या प्रतिमेस अर्पित करून ५०० भीमा कोरेगाव महार सैनिकांना महार सैनिक जयवंत गडपायले, जय पाटी ल, विलास मेश्राम, सम्राट पगारे, पंजाबराव पाटील, पद्दमाचंद पंचभाई, उत्तम मेश्राम, अशोक बन्सोड, विश्व राज हाडगे, मुकेश सोनेकर, राजकुमार पाटील, नागसे न मानकर, दिलीप गेडाम, धनराज चोरपगार, प्रभाकर शिरसाट, धर्मशील सोंनडवले, चंद्रशेखर चहां दे, संजय सोनोने, संतोष शिरसाट, मोहन गावंडे, शिवपाल वाघ मारे, रोशन मेश्राम, रमाकांत पानतावणे आदीनी पुष्प चक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी कन्हान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व समता सैनि क दलाच्या सिंधुताई वाघमारे, सुशील कळमकर, तुळ जाबाई रामटेके, प्रमिला घोडेस्वार, अनिता दुपारे, कल्पना फुलझले आदीनी सुध्दा पुष्पचक्र अर्पण करू न अभिवादन केले. त्यानंतर महार बटालियन सैनिक आणि समता सैनिक दल द्वारे भीमा कोरेगाव शौर्य दिवसाच्या स्मरणार्थ क्रांती ची मशाल प्रज्वलित करून अखंड १२ तास ठेऊन ५०० शुरवीर भीमा कोरेगाव महार पराक्रमी सैनिकांना अभिवादन करण्यात आले.  मशाल कार्यक्रमाचे आयोजन रॉबिन निकोसे व राजेंद्र फुलझले हयानी केले होते. या मानवंदना अंततः दोन मिनिट मौनधारण करून शोककुल बीगुल वाजवुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महार सैनिक विला स मेश्राम द्वारे वर्ड ऑफ कमांड देऊन शूरवीर ५०० भीमा कोरेगाव महार सैनिकांना महार गान व सलामी देत श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी के एस लामा भंतेजी द्वारे आयोजित सत्कार समारंभात महार बटा लियन चे महार सैनिक व समता सैनिक दल आणि उपासक, उपासिका तसेच सामाजिक कार्यकर्ता ला स्मृतीचिन्ह देत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास उपासक भगवान नितनवरे, विनायक वाघधरे, दौलत ढोके, मनोज गोंडाणे, राजेश फुलझले, चेतन मेश्राम, आदित्य टेंभुर्णे, रोहित मानवटकर, नरेश चिमणकर, रतनदीप, पंकज रामटेके, अभिजीत चांदुरकर, नितेश मेश्राम, विवेक पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.