श्री गजानन शिक्षण सेवा संस्था द्वारा व लायन्स क्लब ऑफ नागपूर सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निशुःल्क रोगनिदान व समस्या निराकरण शिबिर चे आयोजन

20

कामठी – प्रा. अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांच्या संकल्पनेतुन ग्रामीण भागातील वृद्ध महीला व बालके यांचे आरोग्य शृड, धृड रहावे म्हणून भामेवाडा आणि चिकन येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सर्वसाधारण तपासणी, स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, रक्त तपासणी, आस्टायोपोरोसिस (हाडांची तपासणी), नेत्र रोग तपासणी करून रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले व नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी केले.

या शिबिराला प्रामुख्याने कु. दिशा चनकापुरे सभापती पं.स. कामठी, दिलीप वंजारी उपसभापती पं.स. कामठी, माजी सरपंच संभाजी गावंडे, ला. चंचल गायधने अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ नागपूर सेवा, ला. प्रवीण गायधने, डॉ. सोनाली बाके वैद्यकीय अधिकारी, डॉ. साहिल, डॉ. जिज्ञासा, डॉ. सोनू वैद्य, डॉ. सचिन सुपारे, डॉ. सुशांत बोकडे, डॉ. तेजश्री भोयर, डॉ. अजय बुजाडे, डॉ. मयुरी वलथरे, डॉ. स्वाती राऊत, भामेवाडा सरपंच कविता फुकट, उपसरपंच रतन उके, चिकना उपसरपंच सीमा मानवटकर, माजी सरपंच नंदकिशोर खेटमले, सदस्य निशा तीवाडे, पूजा बचाले, अर्जुन राऊत, सुधाकर ठवकर, रामभाऊ डाबरे, पुंडलिक धानोरकर, मिलिंद गावंडे, संभाजी वाघमारे, रवींद्र बंगडकर, पुरुषोत्तम बचाले, खेमराज रंगारी, नितीन बांगडे, भगवान फुकट, अशोक उके, जयसिंग फुकट, धर्मराज फुकट, विष्णू भोयर, तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थितीत होत्या. या शिबिराचा १००० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.