नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी

29

कोराडी : नवीन वर्ष असून जगदंबा महालक्ष्मी देवी चे दर्शन घेण्या करिता ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी केली होती. शेकडो नाही तर लाखो लोक महालक्ष्मी देवी चे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे असलेले दिसले. नवीन वर्षाची सुरुवात देवींच्या आशीर्वादाने व्हावी, अशी रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक भाविकाची इच्छा होती. जेणेकरून त्यांचे संपूर्ण वर्ष आनंदात जाईल.

मंगळवारी सायंकाळपासूनच हजारो भाविकांचे मंदिरात आगमन होऊ लागले. 2024 ला निरोप देताना आणि 2025 वर्षाचे स्वागत करताना भाविकांनी जगदंबा महालक्ष्मी देवीच्या चरणी प्रार्थना केली. मंदिर व्यवस्थापनाने दर्शन व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती. १ जानेवारी या दिवशी भाविकांना दर्शनासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशाषण तर्फे उत्तम व्यवस्था करण्यात आली होती . भजन-कीर्तन आणि विशेष आरती आयोजित केल्याने वातावरण आणखीनच दिव्य झाले.