हिंगणा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अजय धर्मपुरीवार

63

हिंगणा (ता १८): तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अजय धर्मपुरीवार, कार्याध्यक्ष रवींद्र कुंभारे तर सरचिटणीस पदी मनोज झाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुका पत्रकार संघाची विशेष सभा रवीवारी( २२) झोन चौक येथील हॉटेल ग्लोरी सभागृहात जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


पत्रकार संघाचे तत्कालीन पदाधिकारी स्व. मधुकरजी राजधरकर ,स्व. संजय खळतकर, पत्रकार देवेंद्र सिरसाट यांना पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर हिंगणा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी सर्वानुमते अजय धर्मपुरीवार, उपाध्यक्ष सुनील भोंबळे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कावळे, कार्याध्यक्ष रवींद्र कुंभारे, सरचिटणीस मनोज झाडे, कोषाध्यक्ष रोशन आमनेरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.मावळते अध्यक्ष राजेंद्र सांभारे ,सरचिटणीस मधुसूदन चरपे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वराडे उपस्थित होते.