मतदान यादी दुरूस्त (शुद्धीकरण) करा ,लेकुरवाळे यांचे तहसीदार यांना निवेदन

107

कामठी – महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात बिडगाव येथील महिलांनी तहसीलदार कामठी यांना मतदान याद्यातील घोळ त्वरित दुरूस्त (शुद्धीकरण) करणे तसेच सध्या कार्यरत असलेले बी.एल.ओ. हे अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना बदलणेबाबत निवेदन देण्यात आले.
नगरपंचायत बिडगाव अंतर्गत येणाऱ्या भागातील मतदारांची नावे इतरत्र मतदान याद्यांमध्ये समाविष्ट झालेली आहे. जसे आराधना नगर बिडगाव येथील मतदारांची नावे, तरोडी बु. आणि तरोडी खु. च्या मतदान यादीमध्ये समाविष्ट आहे, तरोडी खु. येथील मतदारांची नावे बिडगाव मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे नक्की कोण कुठले आहे हे समजत नाही. आणि वार्ड न. ३ बिडगाव येथील दारूचे दुकान बंद करण्यासाठी त्या भागातील रहिवाशी लवकरच मतदान प्रक्रिया घेऊ इच्छित आहे परंतु त्यांना यशाची खात्री नसल्यामुळे मतदान याद्या दुरुस्त (शुद्धीकरण) करणे फार गरजेचे आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या निवडणुका सदोष पद्धतीने नको व्हाव्या म्हणून या याद्या दुरुस्त (शुद्धीकरण) करून ज्या भागातील रहिवाशांची नावे त्याच भागातील मतदान यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे.
सध्या कार्य करीत असेलेल्या बी.एल.ओ. यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी वोटर स्लीप या घरोघरी पोहचविण्याचे काम न-करता कार्यकर्त्यांकडे दिल्या आणि त्यांना वाटायला सांगितल्या यावरून हे लक्षात येते की ते अकार्यक्षम आहेत. तसेच त्यांना स्वतःच त्या यादीतील मतदारांची ओळख नाही किंवा ते तिथे राहतात की नाही याबद्दल माहिती नाही. त्यामुळे सर्व बी.एल.ओ. यांना बदलवुन नविन बी.एल.ओ. नियुक्त करून त्यांना जबाबदारी देण्यात यावी. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले यावेळी बिडगाव येथील समग्र महिला उपस्थित होत्या.