ई -केवायसी करूनही मिळाली नाही अवकाळी ची मदत ?

49

ई -केवायसी करूनही मिळाली नाही अवकाळी ची मदत ?

शेतकरी आर्थिक विवंचनेत. 

मुल(प्रती)

गेल्या महिन्यात सरकारकडून अवकाळी पाऊस मदत निधी वर्ष (२०२४) साठी ई- केवायसी प्रक्रिया राबविण्यात आली. तालुक्यातील शेकडो नुकसानग्रस्त शेतकरी ई- केवायसी केलेत. परंतु अजूनही हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.

मागील वर्षी मोठ्या प्रमाणांत अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीचे, पिकाचे नुकसान झाले. शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली. पात्र शेतकऱ्यांची तालुका प्रशासनाकडून यादी जाहीर करण्यात आली.शेतकऱ्यांना (ई-केवायसी) करण्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांनी विहित कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. परंतु अजूनही आधार प्रमाणीकरण ई-केवायसी केलेल्या शेतकर्यांना आज महिन्याचा कालावधी लोटला असतांना सुद्धा शासनाकडून एक छदामही मिळाला नाही. आर्थिक टंचाईत असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडून बोळवण होत असल्याने ई-केवायसी केलेल्या शेतकर्यांनी सरकारप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरवर्षी  नैसर्गिक आप्पतीची झळ सोसत असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित अवकाळीची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करून ई -केवायसी केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

“अवकाळी पाऊस मदत निधी साठी तालुका प्रशासनाकडून ई-केवासी करण्याचे सांगण्यात आले . शेतकर्यांनी (ई-केवाय सी) प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु आज महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना  शासनाकडून मदत निधी मिळालेला नाही. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर  अवकाळी पाऊस मदत निधी (२०२४) देण्यात यावा.”

प्रमोद गणपत चलाख, नुकसानग्रस्त शेतकरी तथा माजी सरपंच हळदी.