खरीप संपला ; शेतकरी रब्बी हंगामात व्यस्त.

29
खरीप संपला ; शेतकरी रब्बी हंगामात व्यस्त.
मुल(प्रति)
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संपला असून शेतकरी रब्बी हंगामातील पिकाच्या लागवडीसाठी सज्ज झाला असून तालुक्यात शेतकरी रब्बी हंगामात व्यस्त झाला आहे.
rabbi
तालुक्यातील  खरीप हंगामात धान पीक मुख्य पीक आहे. तालुक्यात धानाची मोठी बाजारपेठ आहे. येथील उत्पादित धान पिकाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मुख्य पीक धान असल्याने शेतकरी याच पिकावर आत्मनिर्भर असतो.
खरीप हंगामातील पिकानंतर शेतकरी गेल्या काही वर्षापासून रब्बी हंगामाकडे वळला आहे. तालुक्यात बरेच ठिकाणी सिंचनाची सोय झाल्याने शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान तसेच मक्का  आणि भाजीपाला पिक घेण्यासाठी शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे.
उत्पादित पिकाला योग्य दर आणि शासकीय अनुदानावरील सुविधा शेतकऱ्यांना सहज उपलब्ध करून दिल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बीचे क्षेत्र वाढेल असा आत्मविश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.