कन्हान : – सदभावना नगर कांद्री-कन्हान येथील रहिवासी महेंद्र बर्वे यांची कुणीतरी अज्ञात आरोपीनी रात्रीला पानतावने कॉलेज जवळील हरडे लेआ ऊट च्या जागेतील रस्त्यावर चाकुने वार करून व मोठा दगडाने ठेचुन निर्दयी हत्या करण्यात आल्याने चांगली खळबळ उडुन नविन वर्षात दोन हत्या झाल्याने नागरिकात असुरक्षितेमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवार (दि.२३) मार्च ला रात्री ११. ३० वाजता महेंद्र टिकाराम बर्वे वय ३० वर्ष रा. सदभावना नगर वार्ड क्र. ६ कांद्री हा रात्री जेवण करून फोनवर बोलत फिरायला गेला होता. परंतु रात्री घरी परत आलाच नाही. सकाळी स्थानिय नागरिकांना पानतावने कॉलेज जवळील हरडे लेआऊट च्या जागेती ल रस्त्यावर मृतदेह आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली. कन्हान पोलीसां ना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचुन पाहिले असता महेंद्र बर्वे यांची कुणीतरी अज्ञात आरोपीनी धारदार शस्त्राने सपासप वार करून रक्तबंबाळ करित डोक्यावर मोठया दगडाने मारून ठेचुन निर्दयी हत्या केल्याचे पोलीसां च्या निर्दशनात आले. पोलीसानी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणी करिता मेयो शासकिय रूग्णालय नागपुर येथे पाठविले आहे. कन्हान पोली सानी मोठा भाऊ जितेंद्र टिकाराम बर्वे वय ३२ वर्ष यांचे तोंडी बयाणावरून अज्ञात आरोपी विरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
महेंद्र बर्वे हा नगरपंचायत कांद्री येथील कंत्राटी कर्मचारी असुन लोकांना व्याजाने पैसे दयाचा. पैश्याच्या देण्या घेण्याच्या कारणावरून काही लोकानी त्यास रात्री बोलावुन पैश्याच्या वादात भांडण करून त्याचे चेह-यावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्यान तो रक्तबंबाळ खाली पडल्यावर त्याच्या डोक्या वर मोठया दगडाने मारून ठेचुन निर्दयी हत्या केली असल्याचे नागरिकात चर्चा रंगली आहे. कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील व स्थागुअशानाग्रा पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करित संशयित दोघाना ताब्यात घेतले असुन हत्येचे कारण व आरोपी चा शोध घेत आहे.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत २०२५ नविन वर्षात (दि.१५) फेब्रुवारी ला कोळसा खदान नं.६ रात्री दारूडया मुलाने जन्मदात्या आई ला मारहाण करून हत्या केली. (दि.२३) मार्च च्या रात्री युवकास धारदार शस्त्राने वार व दगडाने मारून ठेचुन हत्या केल्याचे उघडकीस आल्याने गुन्हेगार डोकेे वर काढत असल्याने परिसरातील नागरिकात चांगलेच भितीचे वातावरण निर्मा ण झाले आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत आज (दि.२४) मार्च ला दुपारी नागपुर ग्रामिण पोलीस अ़धिक्षक हर्ष पोद्दार हयानी घटनास्थळी भेट देऊन, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, स्थागुअशानाग्रा पो नि. ओमप्रकाश कोकाटे व कन्हान पो नि राजेंद्र पाटील याना तात्काळ आरोपीना पकडुन योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.










