कामठी – बाल वयात विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करण्याची पालकाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे मत मेडिकल कॉलेज नागपूरचे अधीक्षक डॉ अविनाश गावंडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरच्या वतीने वासल्य प्री प्रायमरी स्कूल प्रोफेसर कॉलनी रनाळा येथे आयोजित सुदृढ बालक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले सुदृढ बालक स्पर्धा व बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मेडिकल हॉस्पिटल नागपूरचे अधीक्षक डॉ अविनाश गावंडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी रनाळा ग्रामपंचायतचे सरपंच पंकज साबळे बालरोगतज्ञ डॉ कल्याणी कडू ,डॉ सोनिया थाणगावेलू ,प्राचार्य स्वाती साबळे ,आरोग्य सहाय्यक चेतन कडू, प्रफुल्ल महाते उपस्थित होते सुदृढ बालक स्पर्धा व बालकाची आरोग्य तपासणी शिबिरात 120 विद्यार्थी सहभागी झाले होते आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ अविनाश गावंडे म्हणाले, बाल वयात विद्यार्थ्यांना चांगलं सुंदर ज्ञान यासाठी पालकाची महत्त्वाची जबाबदारी असून वयानुसार वाढणाऱ्या बालकांच्या आवडी -निवडीनुसार भावना बदलत असतात त्या भावना पालकाने समजून उत्तम संस्कार देण्याची आवश्यकता आहे सोबतच आऊटडोर खेळांमध्ये विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने खेळू देण्याचे आव्हान सुद्धा केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्राचार्य स्वाती साबळे यांनी करून शाळेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली कार्यक्रमाला अश्लेषा मेश्राम , रिता चरबे, वीणा नायडू ,स्वाती कावळे,पूजा पाखमोडे,वैदेवी बावणकर, साधना कोकास,विषाका कुकडे










