मैत्र्य सख्यांचे महिला मेळावा

19

कामठी- प्रा. अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे अध्यक्ष मैत्र्य सख्यांचे सामाजिक संस्था नागपूर यांच्या संकल्पनेतून वडोदा या गावामध्ये महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून विविध खेळांचे जसे की, उखाणे स्पर्धा, दोरीवरच्या उड्या, फुगडी स्पर्धा, रस्सीखेच, लिंबू चमचा, चेंडू टप्पा, भावगीत, डान्स इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. व्यक्तिमत्व विकास आर्थिकदृष्ट्या महिलांना सबल कसे व्हावे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. मागील काही दिवसा पासून मैत्र्य सख्यांचे संस्थेद्वारा रानमांगली, चिखली, परसोडी, भुगाव, नान्हा मांगली, झरप, इत्यादी गावांमध्ये अशा प्रकारच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित प्रा. अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे अध्यक्ष मैत्र्य सख्यांचे तथा माजी सभापती महिला व बालकल्याण जि.प.नागपूर, कु. दिशाताई चनकापूरे माजी सभापती पं.स. कामठी, दिलीप वंजारी माजी उपसभापती पं.स. कामठी, नंदा ठाकरे सचिव मैत्र्य सख्यांचे, ग्रा.प. सदस्य पंकज ढोरे, मंगलमूर्ती थोटे, ताराबाई भोयर, छाया हलमारे, छाया ढोके, रेखा जंजाळे, शिल्पा भिवगडे, सुरेखा निंबार्ते, भावना वानखेडे, सीआरपी ज्योती इंगोले, सरिता उमक, बँक सखी अल्का गंगापारी, तंटा मुक्ती अध्यक्ष सुधाकर ठवकर, नासिर शेख, आदींसह समग्र महिला उपस्थित होत्या. तसेच संपूर्ण महिला मेळाव्यामध्ये पाच हजार पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला.