भारतीय कलाकार शाहीर मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

41

कामठी – भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात शाहीर डॉ राजेंद्र भीमराव बावनकुळे यांचे निवासस्थानी हनुमान नगर,कामठी येथे शूर विरांचे पोवाडे गायन करून साजरी करण्यात आली.सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आणि फोटो ला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले जय शिवाजी जय भवानी जय घोष करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ शाहीर चिरकूट पुंडेकर, शाहीर भगवान लांजेवार,शाहीर मधुकर शिंदे मेश्राम, शाहीर डॉ राजेंद्र बावनकुळे, शाहीर गजानन वडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर वीरांचे पोवाडे गायन करून उत्साहात जयंती साजरी केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ,गोयल टॉकीज कामठी येथे शाहिरी वेश भूषेत फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करून जय घोष करण्यात आले. यावेळी शाहीर डॉ राजेंद्र बावनकुळे, शाहीर भगवान लांजेवार, शाहीर चिरकूट पुंडेकर, शाहीर मधुकर शिंदे मेश्राम, शाहीर गजानन वडे, हरिनाथ लेंडे,रायभान तेलंगे,बापूराव शिंदे मेश्राम, गिरीधर बावणे,श्रावण लांजेवार, रमेश गणोरकर, हिरालाल लुहुरे, छगन बावनकुळे, मोतीलाल सूर्यवंशी,सौ अरुणा बावनकुळे, सौ मीना कुंभलकर आणि शाहीर कलाकार उपस्थित होते