गोंडेगाव येथे मातीत दबलेल्या चिरया देव मुर्तीचे स्थलांतरण

23
कन्हान : – वेकोलि गोंडेगाव खुली खदान व्दारे गोंडे गाव चे संपुर्ण पुनर्वसन न केल्याने अर्ध्या पेक्षा कमी गावकरी गावातच राहत असुन गावा सभोवती माती डम्प करून मोठ, मोठया कृत्रिम डोगर केले आणि  आणखी उंच करित असल्याने तेथील माती खाली घसरून गावात येत आहे. वेकोलीने गावासभोवतील मंदीर व मुर्ती स्थलांतरण न केल्याने ते सर्व मातीत दाबल्या जात आहे. असेच गोंडेगाव येथील चिरया देव हे माती मध्ये दबलेले असल्याने काही भाविक व गाव क-यांनी पुढाकार घेत चिरया देवाची पुजा, अभिषेक करून त्या मुर्तीस पोकलेंड मशीन व्दारे बाहेर काढुन पुनर्वसन नविन गोंडेगाव येथे स्थलांतरण करण्यात आले आहे.

मंगळवार (दि.२१) जानेवारी २०२५ ला वेकोलि गोंडेगाव कॉलोनीच्या मागे जूने गोंडेगाव येथील चिरया देव हे वेकोलि माती डम्पींगमुळे माती मध्ये दबलेले असल्याने भाविकासह गावकरी सर्वांनी पुढाकार घेत वेकोली गोंडेगाव खुली खदान ला पोकलेंड मशीन मागुन साटक गोंडेगाव जिल्हा परिषद सर्कल प्रमुख अनुप भाऊ भुते यांचा हस्ते चिरया देव मुर्तीची पूजा अभिषेक करून चिरया देवाची दबलेली मुर्ती बाहेर काढुन स्थलांतर करण्यात आले. आणि लवकरच पुन र्वसन नविन गोंडेगावा मध्ये या मूर्तीची स्थापना मंदिरा त करण्यात येणार आहे. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक शरद राऊत, कृष्णाजी ठाकूर, नितेश राऊत, नामदेव फरकाडे, रिंकू मधुमटके, रवि कनोजे, तुषार मुरकुटे, वसंता वाघाडे, सत्यवान सिंह, प्रितम वरठी, संजय रासेगावकर, मारोती लसुंते, निलेश कुंभलकर सह बहुसंख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते.