कन्हान : – हॉकर्स युनियन कृती समिती कन्हान व्दारे माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वा त नगरपरिषद मुख्याधिकारी मा. दिपक घोडके हयाना शिष्टमंडळ भेटुन ग्रोमोर व्हेंचर्स ले-आउट धारकाला लाभ पोहचविण्याकरिता त्यांच्या ले-ऑऊट सामोरचे महामार्गालगतच अतिक्रमण कार्यवाही कुणाच्या दबा वात योग्य न करता ९० दुकानदारांवर अन्याय करून त्याना बेरोजगार करून उपासमारीची पाळी आणली का ? असे अनेक प्रश्न विचारून पुंजीपतीच्या हितार्थ दुकाने हटवुन बेरोजगार केलेल्या दुकानदारांचे त्वरित पुनर्वसन करा. अन्यथा (दि.२७) जानेवारी नंतर तिव्र जन आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे प्रशासकीय प्रमुख म्हणुन नागरिक दुकानदारांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चा विचार न करता ग्रोमोर व्हेंचर्स ले-आउट धारकाला लाभ पोहचविण्याकरिता त्यांच्या ले-ऑऊट सामोरिल म्हणजेच हिंदुस्थान लिव्हर प्रा. कंपनीच्या सामोरिल महामार्गाच्या जागेत ३० ते ४० वर्षापासुन कच्चे,पक्के दुकाने लावुन आपला व परिवारांचे पालनपोषण कर णा-या ९० दुकाने इंडियन होम पाईप कंपनी सामोरचे ६ दुकाने न हटविता कंपनीच्या गेट पासुन ते स्टेशन रोड पर्यंत ची दुकाने शनिवार (दि.४) जानेवारी २०२५ ला आपण स्वतः नगरपरिषदेचे अधिकारी, पी डब्लु डी चे अधिका-यासह पोलीस प्रशासनाच्या मदतीने महा मार्गाच्या रिकाम्या जागेतील मुख्य नाली बंद झाल्याचे कारण सामोर करून दुकानावर बुलडोजर चालवुन जर दुकाने तोडली तर होम पाईप कंपनी सामोरिलच ६ दुकाने तोडली नाही का ? (दि.३०) डिसेंबर ला दुका नरांना पाच दिवस कमी अवधी देऊन पाचव्या दिवसी च दुकाने तोडण्यात आली का ? कच्या, पक्का दुकाना चा पुर्ण मटेरियल नगरपरिषदेने जप्त करून वेगळा ठेवला नाही का ? अतिक्रमण हटविण्याकरिता नगर परिषदेने वापरलेल्या जेसीबी, क्रेन, हॉयड्रा मशीन, बुलडोजर, ट्रक, ट्रक्टर हेच अतिक्रमण कारवाईच्या रात्री ले-आऊट धारकाने हिंदुस्थान लिव्हर लि.(ब्रुक ब्रांड कंपनीची १९४२ सालची जुनी कंपाऊड भिंत तोडण्यास वापरली का ? अतिक्रमण तोडणारे व भिंत तोडणा-या जेसीबी, हायड्रा मशीन, बुलडोझर, ट्रक, ट्रक्टर सारखे कसे असु शकतात ? नियमानुसार प्रशा सकीय खर्च कोणत्या विभागाने केला आणि कोणत्या प्रशासकीय संस्थेला पोलिस बंदोबस्त मिळाला होता. त्याच नालीवर ले-आऊट धारकाने रात्रीला रेती, गिट्टी कुणाच्या परवानगीने टाकली ? नगरपरिषद ही बंद झालेली नाली कधी बनविणार आहे ? असे अनेक प्रश्न मुख्याधिका-यांच्या कार्यप्रणाली वरून निर्माण झाल्या ने शासन, प्रशासन जनतेचे की, पुजीपती ले-ऑऊट धारकाचे हा सुध्दा गंभीर चिंतनाचा विषय निर्माण झाला आहे.
कन्हान शहरातील मुख्य महामार्गावर दोन्ही बाजु ला नालीवर व फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रम ण असताना नगरपरिषदेने मुख्य महामार्गावरील मह त्वाच्या नगरपरिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया सामोरील अतिक्रमण हटविले का नाही ? आपण नगर परिषद मुख्याधिकारी हे कन्हान-पिपरी शहराचे शास कीय प्रमुख असता येथील संपुर्ण नागरिकांच्या सोयी सुविधाचा गांभीर्याने लक्ष न देता फक्त एका पुंजीपती ग्रोमोर व्हेंचर्स ले-आउट धारकाला लाभ पोहचविण्या करिता ९० दुकाने तोडुन दुकानदारास बेरोजगार करू न त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आणल्याने यात एक दोन व्यकती मरण पावली तर आपण स्वतः जवाबदार राहाल. करिता आपण तात्काळ या सर्व दुकानदारांचे त्वरित पुनर्वशन करून त्यांचे दुकाने पुर्व रत सुरू करावी. अन्यथा येणा-या (दि. २७) जानेवारी नंतर आपल्या विरूध्द तिव्र जन आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव हयानी कन्हान हॉकर्स युनियन, कृती समिती कन्हान दुकान दाराच्या हितार्थ दिला आहे. मा. जिल्हाधिकारी साहेब नागपुर, मा. तहसिलदार साहेब पारशिवनी, मा. उपवि भागिय पोलीस अधिकारी कामठी-कन्हान, पोलीस निरिक्षक कन्हान आदी वरिष्ट अधिका-यांना माहितीस व योग्य कार्यवाहीस प्रतिलिपी अग्रेशित करण्यात आल्या आहे.
शिष्टमंडळात रामटेक शिवसेना माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात कन्हान हाकस युनियन कन्हानचे प्रशांत पाटिल, चिराल वैध, दिगंबर हारगुडे, प्रकाशसिंह परम सिंह, सचिन चकोले, अमोल रामटेके, नुसरत परवेज, किशोर चौधरी, राजेंद्र चौधरी, महेश धोगडे, बंटी हेटे, सौरभ वाघमारे, राहुल रामटेके, अमोल मोहबे, सरोज बुंदेलिया, इंदिरा वालदे, अनिता वाघमारे, वनिता बुंदे लिया, अनिल हटीले, सूनिल हटीले, सुनिल खरवार, सुभाषचंद्र अहिरवार, पंजाब वानखेड़े, राहुल वानखेड़े, संजय रंजेश, संदीप बुंदेलिया, रमेश सह दुकानदार प्रामुख्याने उपस्थित होते.










