तारसा रोड रेल्वे उडाण पुलावर ट्रक व स्कार्पियो ची धडक

18
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड रेल्वे उडाण पुलावर उमरेड कडुन येणा-या कोळसा ट्रक ला सामोरून येणा-या स्कार्पियो चारचाकी वाहनाने धडक मारल्याने दोन्ही वाहनाचे नुकसान झाले असुन कुठलिही जिवहानी झाली नाही.
            तुळशीराम जयराम गोलीस वय २९ वर्ष राह. कांद्री  वार्ड क्र.१ हे आयुष ट्रॉन्सपोर्ट येथे ५ वर्षापासुन ड्रायवर म्हणुन काम करित असुन गुरूवार (दि.१६) जानेवारी २०२५ ला दुपारी २.३० वाजता दरम्यान ट्रक क्र.एमएच ४० बीएल १०१६ मध्ये उमरेड येथुन कोळ सा भरून येत असता तारसा रोड रेल्वे उडाण पुलावर सामोरून येणारी पांढ-या रंगाची स्कार्पियो चारचाकी वाहन क्र एमएच ४० केआर ८५७३ यांनी विरूध्द दिशे ने येऊन ट्रक ला धडक मारून ट्रकचे अंदाजे २०,००० रूपयाचे नुकसान केल्याने स्कार्पियोच्या चालकास म्हटले असता तो दारूच्या नशेत असुन जोर जोरात ओरडुन शिविगाळ करित होता. तेव्हा तुळशीराम ने त्याचे मालक विनोद कैन्हयालाल धुसिया यांना फोन करून बोलाविले. मालकाने येऊन पोलीसांना फोन करुन घटनास्थळावर बोलविले. पोलीसांनी घटनास्थ ळी पोहचुन दोन्ही वाहन बाजुला हटवुन रहदारीची वाहतुक सुरळीत केली. या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले असुन कुठलिही जिवहानी झाली नाही.
      ट्रक चालक तुळशीराम जयराम गोलीस रा. कांद्री याने कन्हान पोस्टे ला स्कार्पियो चालका विरूध्द तक्रा र दिल्याने शुक्रवार (दि.१७) ला पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीसानी आरोपी स्कार्पियो चालका विरूध्द कलम २८१, ३२४ (४) बीएनएस २०२३, १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.