कोंबडया झुंजीवर धाड मारून तीन लाख सत्तर हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त

15
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत एम.जी नगर येथे सुरु असलेल्या कोंबड बाजारावर कन्हान पोलीसांनी धाड मारुन तीन लाख सत्तर हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त  करुन वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
      प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.१२) जानेवारी ला दुपारी तीन वाजता दरम्यान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहिती मिळाली कि,  एम.जी. नगर कन्हान येथे काही इसम कोबंड्याची झुंज लावुन पैशाची हारजीतचा खेळ खेळवित आहे.  या माहितीवरुन पोलीसांनी एम.जी.नगर, कन्हान येथे जाऊण पाहणी केली असता रेल्वे उडान पुला खाली दुचाकी वाहन उभ्या दिसल्या व तेथे काही इसम कोंब ड्याच्या पायाला लोखंडी धारदार काती बांधुन कोंबड याची झुंज पैशाने लावुन हारजितचा खेळ खेळतांना दिसुन आले. लपत छपत जाऊन रेड केली असता पोलीसांना पाहुन खेळणारे लोक त्यांचे दुचाकी वाहन सोडुन कोंबडे हातात घेवुन पळुन गेले. तर पोलीसांना
तीन कोंबडे जख्मी अवस्थेत त्यांच्या पायाला लोखंडी धारदार काते बांधुन असलेल्या अवस्थेत मिळुन आले . आणि पळून गेलेल्या लोकांच्या तीन दुचाकी वाहन मिळुन आल्याने पोलीसांनी घटनास्थळावरून तीन कोंबडे अंदाजे किंमत ५५० रुपये व दुचाकी वाहन १) हिरो डिलक्स एच एफ काळ्या रंगाची दुचाकी वाहन क्र. एमएच ४० बीटी ८५५१ किंमत १,१०,००० रुपये , २) पल्सर २२० काळ्या रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच ४० बीपी ९१२७ किंमत १,४०,००० रुपये, ३) फॅशन प्लस काळ्या व लाल रंगाची दुचाकी वाहन क्र. एमएच ४० सीएस किंमत १,२०,००० असा एकुण ३,७०,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन जख्मी अस लेल्या कोंबड्याचा उपचार करुन कोंबडा निवाराची व चारापाण्याची सोय नसल्याने पंचा समक्ष लिलाव करण्यात आला. या कारवाई प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन येथे वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.
          सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील, सपोनि राहुल चव्हान, जैयलाल सहारे, अनिल यादव, अमोल नागरे, हरिष सोनभद्रे, महेश बिसेन, आकाश सिरसाट आदि पोलीस कर्मचारी हयांनी शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली.