वेकोलि खुली खदान परिसरात एम.एस.एफ सुरक्षा रक्षकावर हल्लेखोरांचा हमला

24

कन्हान : – नागपुर जिल्ह्यातील वेकोलि कामठी उप क्षेत्र अंतर्गत एकिकृत इंदर कामठी खुली कोळसा खदान परिसरात खाजगी सुरक्षा रक्षकावर अज्ञात हल्लेखोरांनी हमला केला आणि सुरक्षा रक्षकांचे वाहन पेटवुन पसार झाले. या धक्कादायक घटनेमुळे परिस रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार मंगळवार (दि.७) जानेवारी ला रात्री ८ वाजता दरम्यान वेकोलि खुली खदानचे खाजगी एम एस एफ सुरक्षा रक्षक प्रशांत सुधाकर सोनारे, प्रविण ठाकरे, विलास मापारी आणि वाहन चालक आशीष मेश्राम हे महिंद्रा बोलेरो कॅम्पर चार चाकी वाहन क्रं. एम एच ४० सी एम ३३३९ या वाहना ने दोन १२ बोअर रायफल आणि २० राउंडसह खुली कोळसा खदान परिसरात पेट्रोलिंग करित असताना
आर.के.वर्कशॉप जवळ वाहनाला एका अनोळखी व्यक्तीने वाहन थांबवण्याचा इशारा केला. वाहन चाल काने वाहन थांबविले असता तो व्यक्ति वाहनाचा जवळ आला तेवढ्यात प्रशांत सोनारे यांचा साईड ने दोन इसम हातात तलवारी घेऊन मातीचे ढिगाऱ्याहुन कुदले, एक हल्लाखोर सुरक्षा रक्षकांची दिशा भुल करुन कोणतीही कल्पना न देता वाहनाची चावी काढु न पळुन गेला. दोन हल्लेखोरांनी सुरक्षा रक्षकांना जीवे मारण्याचा उद्देशाने वार केला. वार चुकवुन चालक आशिष मेश्राम आणि सुरक्षा रक्षक विलास मापारी वर्कशॉप कडे पळाले, प्रशांत सोनारे व प्रविण ठाकरे वाहनाच्या मागील बाजुने पळुन गेले. हल्लेखोरांनी त्यांचा तलवार घेऊन पाठलाग केला. सुरक्षा रक्षक दुर जाऊन मागे पाहिले तर एका हल्लेखोराने वाहना जव ळ थांबून त्याला आग लावली. वाहन जळत असल्याने तीनही हल्लेखोर खदान नंबर तीन वस्तीचे दिशेने पळुन गेले. सुरक्षा रक्षकांनी वाहनाच्या जवळ येऊन पाहिले असता मोबाइल, रायफल व गोळ्या आगीत जळुन खाक झाल्या होत्या .
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळ ताच पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील संपुर्ण स्टाफ सह घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सदर घटना गांभी र्याने घेत नागपुर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीसांना मार्गदर्शन करुन योग्य कारवाईचे निर्देश दिले. या घटनेने वेकोलि खुली कोळसा खदान परिसर हादरुन गेला असुन खुली खदान च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वेकोलिने खाजगी एम एस एफ सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षे विषयी गांभिर्याने उपाय योजना करण्याची नितांत आवश्यकता आहे.
या प्रकरणी खाजगी एम एस एफ सुरक्षा रक्षक प्रशांत सोनारे यांचे तक्रारीवरून कन्हान पो स्टे येथे अप क्र. १७/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ , १३२ , ३२६ (एफ) आणि ३(५) बी एन एस गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसानी शोधमोहीम वेगाने सुरू केली आहे.