दर्पणकार” बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती पत्रकार दिनाने थाटात साजरी

22
कन्हान : –  ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनी ग्रामिण पत्रकार संघ कन्हा  न व्दारे डोणेकर सभागृह कन्हान येथे मान्यवरांचे स्वागत आणि पत्रकारांचा सत्कार करून थाटात साजरी करण्यात आली.
           सोमवार (दि.६) जानेवारी २०२५ ला ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे डोणेकर सभागृह कन्हान येथे माजी जि.प.अध्यक्ष मा. शरद भाऊ डोणेकर यांचे अध्यक्षेत आणि ग्रा.प.संघाचे मार्गदर्शक अजय त्रिवेदी, भाजपा जेष्ट नेते डॉ मनोहर पाठक, महामंत्री रिंकेश चवरे, कँप्टन सतिश बेलसरे, व्यावसायीक राजन विनयवार आदी मान्यवराच्या प्रमुख उपस्थित ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण आणि अभिवादन करून कार्य क्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी भोई, ढिवर संघाचे मा. सुतेश मारबते, भुमिपुत्र सामाजिक संघटनाचे शिवशंकर (चिंटु) वाकुडकर, सामाजिक कार्यकर्ते मा. चंद्रशेखर पडोळे, नगरसेवक विनय यादव, शितला माता मंदीर कमेटीचे वामन देशमुख, राजेश पोटभरे, बादल विश्वकर्मा, हॉकर्स युनियनचे श्रीधर केसेट्टी, माजी ग्रा प कांद्री सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, आप चे ज्ञानेश्वर दारोडे, अखिलेश मेश्राम, मुनिदा सुखदेवे,  पुरूषोत्तम रक्षक, गौरव भोयर आदी मान्यवर प्रामु ख्याने उपस्थित होते. कार्यक्रमास कन्हान थानेदार मा. राजेंद्र पाटील हयानी भेट देऊन पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांना वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केक कापुन पत्रकार जयंत कुंभलकर चा वाढदिवस सुध्दा साजरा करण्यात आला. तदंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रामिण पत्रकार संघ कन्हानचे अध्यक्ष मोतीराम रहाटे, मार्गद र्शक अजय त्रिवेदी, कार्याध्यक्ष कमलसिंह यादव, उपा ध्यक्ष गणेश खोब्रागडे, सचिव सुनिल सरोदे, सदस्य शांताराम जळते, मोहन रंगारी, निलेश गाढवे, दिनेश नानवटकर, जयंता कुंभलकर, आकाश पंडीतकर, ऋृषभ बावनकर, रविंद्र कोचे आदी पत्रकारांना वृक्ष, दुपटा, दिनदर्शिका आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश खोब्रागडे यानी तर आभार निलेश गाढवे यानी व्यकत केले. सर्वाना अल्पोहार वितरण करून पत्रकार दिन थाटात साजरा करण्यात आला.