अवकाळी पाऊस मदत निधी केव्हा मिळणार?
ई केवायसी केलेल्या शेतकऱ्यांचा सवाल.
मूल (प्रति)
तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे मदत निधीसाठी इ केवायसी करण्याचे शासनाकडून सांगण्यात आले. मदत निधी प्राप्त करण्यासाठी ई केवायसी बंधनकारक असल्याने हजारो शेतकऱ्यांनी केवायसी केली. परंतु अजूनही दोन-तीन महिन्याचा कालावधी लोटूनही इ केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस मदत निधी मिळाला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
तालुक्यात 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे,पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुका प्रशासनाकडून बाधित शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. पात्र शेतकऱ्याना इ केवायसी बंधनकारक करण्यात आले. अवकाळी पाऊस मदत निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेतू केंद्रातून आपली आधार प्रमानिकरण (ई केवायसी) पूर्ण केली.
परंतु दोन-तीन महिने होऊनही शासनाकडून इ केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मदत निधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारप्रति रोष व्यक्त केला असून ई केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना त्वरित अवकाळी पाऊस मदत निधी विनाविलंब देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.










