धान नोंदणीसाठी सह हिस्सेदार उपस्थित असणे अनिवार्य.
शासनाचे परिपत्रक जाहीर.
मुल(प्रती)
धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की हंगाम २०२५-२६ मध्ये आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी शासनाच्या आधारभुत किंमतीचा लाभ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान विक्री करावे लागु नये म्हणुन मा. जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांच्या अध्यक्षतेखाली धान खरेदी केंद्र मंजुरी समन्वय समिती मार्फत खरेदी केंद्रास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे.

किमान आधारभूत किमतीचा (एम. एस. पी.) लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खरेदी केंद्रावर नोंदणी साठी येत असलेल्या शेतकऱ्यांनी ७/१२ वर एका पेक्षा जास्त सामाईक नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर उपस्थित राहून आपल्या समक्ष ७/१२ उताऱ्यावरील इतर हिस्सेदारांची सहमती घेवुनच नोदणी करण्यात यावी.
सातबारा वरील एकही सह हिस्सेदार शेतकरी उपस्थित झाला नाही, किवा सहमती दिला नाही तर अश्या शेतकऱ्यांची धान खरेदी नोंदणीची ऑनलाईन नोदणी करण्यात येवू नये.
अनुपस्थित असतानाही नोंदणी केली असल्यास आणि भविष्यात काही पेच प्रसंग उद्भल्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची स्पष्ट नोंद घ्यावी असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, कार्यालय चंद्रपुर कडून दिनांक 20/11/2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्राद्वारे कळविले आहे.










