धावत्या रेल्वे मधून पडून तरुणाचा मृत्यू

69

कामठी ता प्र 17:- ,नवीन कामठी पोलीस ठाण्याहद्दीतील मुंबई -हावडा रेल्वे मार्गावरील रनाळा शिवारात शिवनाथ एक्सप्रेस मधून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री साडेतीन वाजता सुमारास घडली असून ईश्वर नरेंद्र कोडूलवार असे आहेत


नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर नरेंद्र कोडुलवार वय 25 वर्ष राहणार बाबा बुद्धाजी नगर इंदोरा नागपूर हल्ली मुक्काम रायपुर छत्तीसगड हा आई व एका लहान भावासह रायपूर येथे खाजगीत कंपनीत नोकरी करून वास्तव्यास आहे नागपूरला काही कार्यक्रमानिमित्त इंदोरा चौक येथे आला होता बुधवारला रायपूरला जाण्यासाठी ईश्वर नरेंद्र कोडूलवार शिवनाथ एक्सप्रेस ने निघाला असता मुंबई -हावडा रेल्वे मार्गावरील कळमना कामठी रेल्वे स्टेशन दरम्यान रनाळा शिवारातील किलोमीटर क्रमांक 1118 केएम /31 पोल जवळ ईश्वर नरेंद्र कोडूलवार मध्यरात्री साडेतीन वाजता सुमारास पडला त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच दरम्यान कामठी रेल्वे स्टेशन मास्टरने घटनेची माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस उपनिरीक्षक भिताडे सहकाऱ्यासह घटनास्थळी गेले असता ईश्वर नरेंद्र कोडुलवार मृत अवस्थेत पडून होता पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले मृतकाच्या खिशात मिळालेल्या मतदान कार्डावरून मृतकाची ओळख पटली व त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली असता त्याचे नातेवाईक नवीन कामठी पोलीस स्टेशनला आले व मृतका विषयी ओळख पटवून घेतली नवीन कामठी पोलीस स्टेशनला कलम 194 भारतीय न्याय संहितेनुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप भिताडे करीत आहेत