होळी सण व धुलिवंदन शांततेत उत्सहाने साजरा

15
कन्हान : –  शहरात आणि ग्रामिण भागात होळी सण जागो जागो होळीचे दहन करून दुस-या दिवसी एक मेकाना रंग, गुलाल लावुन शुभेच्छा देऊन धुलिवंदन उत्सव दोन दिवस शांततेत उत्साहाने साजरा करण्यात आला.
            भारतीय संस्कृतीत होळी सणाला महत्वाचे स्थान आहे . देशात होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो . मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो. आधुनिक काळात आपल्यातील वाईट विचार, व्यसन, प्रथा, सवयी या  होळी च्या माध्यमातुन दहन करतात आणि प्रेमाचा रंग, गुलाल लावुन बंधुभाव जोपासला जातो. म्हणुनच धूलिवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महा राष्ट्रात विविध पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणा ला अनन्य साधारण महत्त्व आहे. रंगांचा सण म्हणुन सुध्दा होळीची ओळख वेगळीच आहे.
          गुरुवार (दि.१३) मार्च ला शहरातील विवेकानंद नगर, अशोक नगर, रायनगर, धरमनगर, पिपरी, स्टेशन रोड, गुरफुडे ले-आऊट, गणेश नगर, हनुमान नगर,शिव नगर, इंदिरा नगर, शंकर नगर, तुकाराम नगर सह परिसरातील गाव खेडयात  ठिकठिकाणी नागरिकांनी मनोभावे पुजा अर्चना करून पुरणपोळीचा नैवेद्य देऊन होळीचे दहन केले. शुक्रवार (दि.१४) मार्च ला धूलिवंदनाच्या दिवशी शहरात व गावात ठिकठिकाणी होळी मिलनचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुले, तरुण आणि महिलांनी आपापले समुह तयार करून एकमेकांना रंग आणि गुलाल लाऊन शुभेच्छा देऊन रंगोत्सव आनंदाने साजरा केला. होळी व धुली वंदन सण उत्सवा दरम्यान शहरात, ग्रामिण भागात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन कन्हान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा नेतृत्वात पोलीसांचा कडक, चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिसरात होळी व धुलिवंदन सण शांततेत उत्साहाने साजरा करण्यात आला.