कन्हान : – परिसरात अवैधरित्या देशी दारु विक्री कर णाऱ्या तीन ठिकाणी कन्हान पोलीसांनी आणि एका ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस पथकाने धाड टाकुन चार आरोपींना अटक करुन त्या चे जवळुन ८७ निपा सह ६०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.
होळी व धुलिवंदन सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी ग्रामिण पोलीसांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. बुधवार (दि.१२) ते शुक्रवार (दि.१५ ) मार्च च्या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस पथक आणि कन्हान पोलीस परिसरा त पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमीच्या आधारे पोलीसांनी पिपरी, एम जी नगर, वाघधरे वाडी, धरम नगर येथे अवैधरित्या देशी दारु विक्री करणाऱ्या अड्यावर धाड टाकुन चार आरोपींना ताब्यात घेतले. पोलीसांनी आरोपींना परवाना विचारले असता परवा ना नसल्याचे सांगितल्याने पोलीसांनी आरोपी १) रमेश गोविंदराव ढोमणे वय ६५ वर्ष, २) अमोल माला धारे वय २० वर्ष, ३) अलताब ईदल पुरवले वय ५० वर्ष, ४) अरविंद अजित गायकवाड वय २० वर्ष चौघे ही राहणार कन्हान यांना अटक करुन त्याचा जवळुन देशी दारु भिंगरी संत्रा नंबर १ चा कागदी लेबल लागले ल्या प्लाॅस्टिक व काचेच्या ८७ निपा किंमत ६०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कन्हान पोलीसात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.









