कन्हान परिसरात महाशिवरात्री महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाने थाटात संपन्न

24
कन्हान  : – पररिसरातील जुनीकामठी श्री कामठेश्वर महादेव मंदिर, शिव मंदीर पिपरी, विवेकानंद नगर, स्टेशन रोड, राय नगर, शिव नगर चौक, गहुहिवरा रोड चौक, श्री हनुमान, गजानन मंदीर पांधन रोड, कांद्री बस स्टाप आणि वराडा गावात महाशिवरात्री महोत्सव विविध धार्मित कार्यक्रमाने ” हर हर महादेव ” च्या जय घोषणा गर्जना सह भव्य महाप्रसादाने भक्तीमय वाता वरणात थाटात साजरा करण्यात आला.
स्वामी विवेकानंद नगर , नगरवासी व मित्र परिवार
            कन्हान शहरातील स्वामी विवेकानंद नगर , नगरवासी व मित्र परिवार द्वारे महाशिवरात्री निमित्त  बुधवार (दि.२६) फेब्रुवारी ला सायंकाळी ७ वाजता श्री माॅ कालिका देवी जागरण ग्रुप परासिया जि. छिंदवाडा व्दारे प्रस्तुती संचालक कपिल भावरकर, ऑडियो व्हिडियो सिंगर शालिनी चौहान, अर्चना टेकाम, पवन नामदेव, निशांत कुमार बादशाह यांचा विशाल शिव जागरण कार्यक्रमाने भाविक भावभिन झाले. गुरुवार (दि.२७) फेब्रुवारी ला शिव मंदिरात पुजा अर्चना, शिव कथा पठन करित महाप्रसाद वितरण करुन दोन दिवसीय महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.
       सार्वजनिक शिव मंदिर पिपरी – कन्हान
             सार्वजनिक शिव मंदिर पिपरी- कन्हान व्दारे भोसले कालीन प्राचीन पिपरी येथील शिवलिंग मंदिर हे कन्हान नदी काठावर असुन बुधवार (दि.२६) ला महाशिवरात्री निमित्त भाविकांनी पुजा अर्चना करून शिवलिंगाचे दही, दुधा ने व पंच अमृताने अभिषेक करुन आरती करण्यात आली. त्यानंतर नागद्वार कढई रवा प्रसाद करुन लगेच भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आला. यावेळी शेकडो शिवभक्तांनी महादेवा चे दर्शन करुन महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी कन्हान पोलीस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पंडित दिपक शर्मा, माजी नगरसेवक मनोज कुरडकर, प्रशांत बाजीराव मसार, देवा चतुर राधेश्याम भोयर, तुषार येलमुळे, कुंदन रामगुंडे, राम कृष्णा गावंडे, प्रल्हाद पहाडे, भगत सोनी, संजय गुडधे , सारंग कुथे, गणेश खांडेकर सह भाविक नागरिक उपस्थित होते.
 
           तारसा रोड शिव मंदिर कन्हान
            कन्हान शहरातील तारसा रोड येथील कृष्णा डेअरी च्या बाजुला लहान शिव मंदिरात बुधवार (दि. २६) ला महाशिवरात्री पावन पर्वावर भाविकांनी विधि वत पूजा अर्चना, भजन कीर्तन कार्यक्रम करण्यात आला. गुरुवार (दि.२७) ला दुपारी ४ ते रात्री उशीरा पर्यंत महाप्रसाद वितरण करुन महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी मंदिरात पुजा अर्चना करून मोठ्या संख्येने महाप्रसा दाचा लाभ घेतला.
       नाग मंदीर जे एन रोड  राय नगर कन्हान 
         नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील राय नगर येथील नाग मंदीरात बुधवार (दि. २६) ला महा शिवरात्री पावन पर्वावर भाविकांनी विधिवत पूजा अर्चना, भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. गुरुवार (दि.२७) ला सायंकाळी ७ वाजता महाप्रसाद वितरण करुन महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी मंदिरात पुजा अर्चना करून मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
    कांद्री बस स्टाप येथे महाशिवरात्री महोत्सव
         नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री बस स्टाप येथील मंदीरात बुधवार (दि. २६) ला महा शिवरात्री पावन पर्वावर भाविकांनी विधिवत पूजा अर्चना, भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. गुरुवार (दि.२७) ला सायंकाळी ७ वाजता महाप्रसाद वितरण करुन महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी मंदिरात पुजा अर्चना करून मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
नवदुर्गा मंदिर पिपरी-कन्हान येथे कढई व महाप्रसाद 
          नवदुर्गा मंदिर पिपरी-कन्हान येथे बुधवार (दि. २६) ला महाशिवरात्री निमित्त मंदीरातील शिव पिंडाची भाविकांनी विधिवत पूजा अर्चना केली. गुरूवार (दि. २७) ला शाबुदाना खिचडी व फळे वितरण करण्यात आले. आणि शुक्रवार (दि.२८) ला पुजा अर्चना सह कढई व महाप्रसाद वितरण करुन तीन दिवसीय महो त्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी देवा चतुर, मनोज कुरडकर, प्रशांत मसार, प्रमोद मोटवानी, बाल्ला खंगारे, राधेश्याम भोयर, बंटी ढोले, स्वप्निल फुलझेले, कुणाल येलमुले, सोनु कुरडकर, फजित खंगारे, पुची खांडेकर, वैभव फुलझेले, श्रावण, सचिन खंगारे, विजु खंडसे, दिपक ताजने, तुषार येलमुले, कुणाल तिवाडे, रोहीत बिलोरे सह ग्रामस्थानी उपस्थित राहुन सहकार्य  केले.
शिव मंदीर पानतावणे महाविद्यालय परिसर कांद्री
           शुक्रवार (दि.२८) ला शिव मंदीर पानतावणे महाविद्यालय परिसर प्रभाग क्र ६ कांद्री येथे “हर हर महादेव, हर हर महादेव,’ च्या जलोष्षात शिव मंदिरात महादेवाचे अभिषेक सौ शोभा रेवाशंकर गायकवाड, सौ सुनिता लक्ष्मीकांत कडुकर यांचे हस्ते करून शिया मानस महिला भजन मंडळ कांद्री यांचे भजन, महादेवाचे गाणी गाण्यात आले. सायंकाळी आरती करून महाप्रसाद वितरण करण्यात आला. यावेळी भजन मंडळी उज्वला राजेश पोटभरे, मनिषा लिंतेश वाडीभस्मे, नलु किशोर पोटभरे, माधुरी गुरुदेव चकोले, रेखा रविन्द्र कामडे, शेशीकला विक्रम गायकवाड, रुपाली योगेश आखरे सह ग्रामस्थ भाविक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता  आयोजक रेवाशंकर गायकवाड, लक्ष्मीकांत कडुकर, रेड्डीजी, राजेश पोटभरे, विक्रम गायकवाड, प्रकाश ढोके आणि सदभावना नगर भाविक मंडळी हयानी सहकार्य केले.
जय भोले शिव पंच कमेटी वराडा व्दारे तीन दिवसीय महाशिवरात्री महोत्सव
            जय भोले शिव पंच कमेटी वराडा द्वारे महा शिवरात्री  निमित्य शिव मंदिरात तीन दिवसीय महोत्स वाची बुधवार (दि.२६) फेब्रुवारी ला सकाळी ८ वाजता शिव महापुजन करून सुरूवात करण्यात आली. दुपा री १२ वाजता शिवगौरी महिला भजन मंडळ  व दुपारी ३ वाजता हरिपाठ भजन मंडळ वराडा यांचे भजन कर ण्यात आले. गुरुवार (दि.२७) फेब्रुवारी ला दुपारी १२ वाजता शारदा महिला भजन मंडळ, ३ वाजता बाल गणेश भजन मंडळ वराडा, रात्री ८ वाजता शिव भजन मंडळ वराड यांचे भजन व कीर्तन करण्यात आले.  शुक्रवार (दि.२८) फेब्रुवारी ला दुपारी १ ते ३ वाजता पर्यंत ह.भ.प.श्री भुषण महाराज खोडे आंळदी यांचे काल्याचे कीर्तन, दहीकाला आणि भव्य महाप्रसाद वितरण करुन तीन दिवसीय महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता जय भोले शिव पंच कमेटी आणि वराडा समस्थ ग्रामस्थानी सहकार्य केले.