दरवर्षी वाढणारी फी व शाळेच्या वतीने पालकांना बळजबरीने पुस्तके आणि ड्रेस खरेदी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

69

शिक्षण विभागात दरवर्षी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरु आहे आणि त्यांच्याच आश्रयाने दरवर्षी फीस वाढ, गणवेश व पुस्तके सांगितलेल्या दुकानात कडून घेण्याची सक्ती होत पालकांना भेटीस धरण्याचे काम सुरू आहे परंतु शिक्षण विभागातील कुणी हि अधिकारी पालकांना न्याय मिळवून देत नाही म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर काढुसे यांना निवेदन देण्यासाठी वेळ घेण्यात आला होता. परंतु ते त्यावेळी गैरहजर असल्यामुळे नारे बाजी आणि तीव्र आंदोलन करत त्यांच्या खुर्चीला हार घालून विरोध प्रदर्शन करण्यात आले.
विभागातील अधिकारी हे पालकांना का न्याय देत नाहीत, शिक्षण विभागातील अधिकारी हे शाळा व संस्थेतील भ्रष्टाचार दडपण्याचा का प्रयत्न करीत आहेत व वाढणारी फीस ताबडतोब बंद व्हावी याकरिता निवेदन देऊन विचारणा करण्यात आली.


मध्यमवर्गीय परिवाराला आज एका मुलाचेही शिक्षण खाजगी शाळेत घेण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात परतू तरीही शाळा व संस्था प्रशासन दर वर्षी पालकांकडून ही वाढ करून पालकांची गळचेपी करत आहे. शाळेच्या आवारात शैक्षणिक साहित्य विक्री करण्यावर बंधन असतांना हि शाळा व संस्थेच्या वतीने पालकांना बळजबरीने नवनीत त्यांनी सांगितलेल्या दुकानांकडून पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जाते, पुस्तकाची एकूण छापील किंमत कमी असतानाही शाळा व संस्था पालकांकडून जास्ती दराने पैसे वसूल करीत आहे, एक एका वर्गात ८० ते ९० मुले कोंबून भरली जातात मुलांना बसायला वर्गात जागा नाही, खेळायला मैदान नाही ,वर्ग खोल्या पुरेश्या नाहीत, तरीही दरवर्षी पालकांकडून इमारत निधीच्या नावे प्रत्येक पालकांकडून लाखो रुपये वसूल केले जात आहेत. अचानक शाळेचा गणवेश मध्ये बदल करून पालकांना नवीन गणवेश, पिटीचा गणवेश घेण्यास भाग पाडणे, गणवेश चढ्या दराने संस्थेने व शाळेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते.
या संदर्भात अनेक वेळेस पालकांनी धरणे आंदोलने केली आहेत. परतू आज पर्यत शिक्षण विभागातील अधिकार्यांनी या तक्रारींची दखल घेतलेली नाही. एक प्रकारे शिक्षण विभाग व शिक्षण विभागातील अधिकारी हे खाजगी शाळांमध्ये सुरु असलेला भ्रष्टाचार दडपण्यासाठी काम करीत आहेत व पालकांवर अन्याय करत आहेत. पालकांना न्याय दिला जात नाही.
शिक्षण अधिकाऱ्यांचे अनुपस्थितीत त्यांच्या खुर्चीला हार टाकल्यानंतर श्री कोकोडे व श्री भुयार उपशिक्षणाधिकारी यांनी सर्व समस्या निवेदनातून समजून घेतल्या व लवकरच शिक्षण विभागातील अधिकार्यांना सांगून हा पालकांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देतांना कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर , युवक अध्यक्ष विशाल खांडेकर , युवक कार्याध्यक्ष अभीदत्त फाले, युवक प्रदेश उपाध्यक्ष जगदीश पंचबुद्धे, सोहेल पटेल, तानाजी वनवे, जानबा मस्के, रवी पराते, राहुल कांबळे, मेहबूब पठाण, एकनाथ फलके, कनिजा बेगम, रवींद्र वाठ, अक्षय श्रीवास, शुभम सुरपांग, आशिष आष्टणकर, अविनाश पार्डीकर, श्रीकांत शिंदे, राहुल खांडेकर, अमित कुमार,अभिजीत साळुंगे प्रीत रामटेके,आकाश चिमनकर, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.