एससी,एसटी समाजाला बजेट मध्ये वाटा आणि वाट्याकरिता कायदा महाराष्ट्र सरकारने पारित करण्यात यावा

15

समता सैनिक दलाचे भव्य धरणा, निदर्शने, उपोषण. समता सैनिक दलाच्या वतीने संविधान चौकात अनुसूचित जाती, जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मध्ये वाटा आणि वाट्याकरिता कायदा सुनिश्चित करा, बजेट बॅकलाॅग जाहीर करा, एससी, एसटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ची उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये करण्यात यावा, रमाई घरकुल योजनेची मर्यादा रु. 5 लक्ष पर्यंत करा, सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय उद्योगाकरीता 4 टक्के दराने अर्थ सहाय्य द्या, मातंग, चांभार व वाल्मिकी – सुदर्शन जातीच्या विकासाकरिता त्यांच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य द्यावे, जिल्हा सामाजिक न्याय विभागाने दरमहा जनता दरबार भरवून मागासवर्गीयांच्या योजनांची अंमलबजावणी आढावा घ्यावा.अन्य इतर विषयांवर संविधान चौकात निदर्शने, धरणे, उपोषण आले. या कार्यक्रमात प्रदीप गायकवाड, देविदास घोडेस्वार सर, अँड. गुणरत्न रामटेके, संजय फुलझेले, शेखर गायकवाड, प्रतिमा कोचे, चंचला मुरारकर, प्रदीप मुन, पुष्कराज तिडके,गौतम शामकुवर, हरिश नागदिवे, राहुल सोमकुवर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.