कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी मा. मुख्याधि कारी हयाना नगरसेवक विनय यादव हयानी निवेदन देऊन खसरा क्र ८९/२ माती उत्खनन करण्याकरिता आलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे.

कित्येक वर्षापासुन माती उत्पननला नगरपरिषद परवानगी देत आहे. ही परवानगी भूस्थळ विभागा व्दारे पाहणी न करता नगरपरिषद कन्हान निरंतर देत आहे. त्याची परिणिती नदी पात्रात पुर आला की माती उत्खनन् करून पडलेल्या गड्डयात पाणी साचुन मोठ मोठी जनावरे तसेच मानुष्य त्या गड्यात पडुन जिव हानी होत नागरिकांची वित्तहानी होत असते. भरगच्छ रहिवासी वस्ती मधुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते पिपरी पांधन रस्ता हा अतिक्रमणामुळे छोटा झाला असुन दोन वाहना ला येण्या-जाण्या करिता लहान रस्त्याची परिस्थिती अत्यंत नाजुक असल्याने माती उत्खननाच्या कामाकरिता जे वाहने १० चक्का, १२ चक्का, १६ चक्का जड वाहने ओव्हर लोड आणि भरधाव वेगाने धावत असल्याने छोटे, मोठे अपघात होत असतात परंतु रस्त्या लगत दोन्ही बाजुला घरे असल्याने या जड वाहतुकीने मोठया प्रमाणात धुळीचे प्रदुर्षन होऊन नागरिकाना भयंकर त्रास सहन करावा लागतो. या रस्तावर मोठया प्रमाणात नागरिकांची व वाहनाची वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाका रता येत नाही. त्यामुळे डॉ आंबेडकर चौक ते राणी बगीचा पिपरी पर्यंतचा पांधन रस्त्याचे अतिक्रमण काढुन पांधन रस्ता मोठा केल्यावरच नगरपरिषद प्रशासनाने माती, रेती या जड वाहतुकी ची परवानगी नियमानुसारच द्यावी. यास्तव खसरा क्र ८९/२ माती उत्खनन करण्याकरिता आलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे. अशी मागणी निवेदन देऊन नगरसेवक विनय यादव हयानी केली आहे.










