रामनगर कन्हान येथुन रात्री दोन गाई चोरी

16
 
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत प्रभाग क्र ४ राम नगर कन्हान येथुन घरा सामोर बांधलेल्या जनावरा पैकी दोन गाई मध्यरात्री कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी पंढरी ठाकरे यांचे तक्रारीवरून अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.
            श्री पढ़री होलुचंद ठाकरे वय ४९ वर्ष रा. राम नगर प्रभाग क्र ४ कन्हान हे पशुपालन व दुध व्यवसाय करित असुन त्यांचे कडे ११ गाई मिक्स प्रजाती च्या असुन तीन वासरु आहे. हे जनावरे घरासामोर नाल्या  जवळ खाली जागेवर बांधुन ठेवतात आणी चारापाणी जागेवर करतात. रविवार (दि.१९) जानेवारी २०२५ला पंढरी ठाकरे परिवारास मित्र राधधिरे पिल्ले रा. पुराना गोदाम कैन्टोर्मेन्ट एरिया कामठी येथे रात्री ९ वाजता गेले आणि कार्यक्रम संपवुन रात्री ११.३० वा. घरी आले. रात्री १२ वाजता आपले सर्व जनावरे बांधलेली गाय व वासरु बघुन घरात जावुन झोपले. (दि.२०) चे पहाटे ४ वाजता त्याची पत्नी सौ.भूमेश्वरी ठाकरे हिने उठवुन सांगितले कि, वासरु जोर-जोराने ओरडत आहे . तेव्हा लगेच जावुन पाहिले तर एक सेन्द्री फिकट रंगा ची जर्सी मिक्स गाय किमत अंदाजे ३०,०००/- रू. व एक सेन्द्री रंगाची गावरान गाय किमत २५,०००/- रू. आणि एक सेन्द्री रंगाची गावरान गाय हया बांधलेल्या जागेवर दिसल्या नसल्याने पंढरी ठाकरे व घरच्या लोकांनी गाईचा शोध घेण्यास सुरुवात केली असता एक सेन्द्री रंगाची गावरान गाय हि पांधन रोड रामनगर येथे दिसली. परंतु दोन गाय दिसल्या नाही. दोन्ही गाई चा शोध कन्हान परिसरात, कामठी. नागपुर, टेका येथे घेतला तरी मिळुन न आल्याने दोन्ही गाय एकुण किम त ५५,०००/- रु कोणीतरी अज्ञात चोराने चोरल्याने फिर्यादी पंढरी ठाकरे यांचे तक्रार वरून कन्हान पोली सानी पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्श नात पोस्टे ला अप क्र. ४५/२०२५ कलम ३०३ (२) बीएनएस अन्वये अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल करून हेकॉ प्रशांत रामटेके पुढील तपास करित दोन्ही गाई व अज्ञात चोराचा शोध घेत आहे.