कन्हान जुने पोलीस स्टेशन मोड रस्ता जवळ ट्रक च्या धडकेत म्हता-याचा मृत्यु

18

कन्हान : – जुने पोलीस स्टेशन जवळील ४५ पेक्षा कमी कोनाच्या मोड महामार्ग रस्तावर कामठी कडुन मनसर कडे जाणा-या बाहार लाईनच्या दहा चाकी ट्रक च्या धडकेत कांद्री येथील मेहतलाल डेहरिया या म्हता-याचा घटनास्थळीच मुत्यु झाल्याने कन्हान पोलीसानी ट्रक पकडुन आरोपी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.
शुक्रवार (दि.२४) जानेवारी २०२५ ला दुपारी १२.३० ते १ वाजता दरम्यान जुेने पोलीस स्टेशन कन्हान जवळील ४५ पेक्षा कमी कोनाच्या मोड महा मार्ग रस्ता असल्याने वाहन चालक व पायदळी लोकां ना सामोर एकाएकी दिसत असल्याने कामठी कडुन मनसर, जबलपुर कडे जाणा-या बाहर लाईनच्या दहा चाकी ट्रक क्र. एमएच ४० – एके ७३५५ च्या चालकाने आपले वाहन बेसावदपणे, निष्काळजीने भरधाव वेगा ने चालवुन जुने पोलीस स्टेशन गांधी चौकातील हनुमा न मंदीरातुन दर्शन करून कांद्री घरी जाणास महामार्ग रसत्यावर पायदळ आले असता म्हता-या इसमास दहाचाकी ट्रक ने जोरदार धडक मारल्याने म्हता-या इसमाचा घटना स्थळीच मुत्यु झाला. कन्हान वाहतुक पोलीस अनिल यादव व शैलेष वराडे यानी नागरिकां च्या सहका-याने त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ऑटोच्या साहाय्याने नेले असता तेथील डॉक्टरांनी म्हतारा मेहतलाल भोजराज डेहरिया वय ७५ वर्ष. राह. वार्ड क्र.४ कांद्री या इसमाचा मुत्यु झाल्याचे सांगितले. वाहतुक पोलीसानी वेळीच दहाचाकी ट्रकचा पाठलाग करून धन्यवाद गेट कांद्री जवळ ट्रकला पकडुन आरो पी ट्रक चालक चुनव प्रेमसिंग, अमरसिंग पलीयाड छत्तीसगड मंडला यास आणि ट्रक ला ताब्यात घेतले असुन थानेदार राजेद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीसानी फिर्यादी मुलगा पप्पु मेहतलाल डेहरिया वय ४३ वर्ष राह. वार्ड क्र ४ यांचे तक्रारीवरून आरोपी ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.