कन्हान : – येथील बीकेसीपी शाळेत दरवर्षी प्रमाणे वार्षिक क्रीडा उत्सव दिवस हा रस्सीखेच, धावनी यासारख्या विविध स्पर्धाचे अप्रतिम आयोजन करून विजेता चंमु व विद्यार्थ्याना पारितोषिक, बक्षीष देऊन थाटात उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास श्री राजेश आंबुलकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक जाईबाई चौधरी ज्ञानपीठ हाईस्कुल व जूनियर कॉलेज नागपुर हे प्रमुख्य अतिथी तर शाळा संचालक समितीच्या श्रीमती पुष्पा गैरोला, श्री अशोक भाटिया तसेच हायस्कुल मुख्याध्यापिका कविता नाथ, प्रायमरी मुख्याध्यापिका रूमाना तूरक आणि गणमान्य पालक प्रामुख्याने उपस्थित होते. शिवाजी, अशोका, मौऱ्या व विक्रम या चारही हाऊसच्या विद्यार्थांनी परेड ने मान्यवरांना मानवंदना देऊव मशाल पेटवुन कार्यक्र माची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यानी सामुहिक कवायत सादर केली. तर इयत्ता ५ ते १० वी च्या विद्यार्थांनी विविध नृत्य प्रकारात कवायत प्रस्तुत करून उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरले. आंतर्राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सेम्बो खेळाचे अतिशय सुंदर प्रात्यक्षिक एन आयएस कोच, क्रिडा शिक्षक अमितसिंह ठाकुर सर यांच्या मार्गदर्शनात प्रस्तुत करण्यात आले. रस्सीखेच, धावनी यासारख्या विविध स्पर्धाचे आयोजन करून विजेत्या खेळाडुंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषि क व बक्षीष देण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी श्री राजेश आंबुलकर सरांनी विद्यार्थ्याना सुंदर मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व प्रस्तुतीकरणा साठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जोत्सना लांजेवार हयानी तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्या ध्यापिका कविता नाथ मँडम हयांनी केले. शारीरिक शिक्षक अमितसिंह ठाकुर, सविता वानखेडे, समीक्षा बादुले यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनात तसेच सर्व शिक्षकां च्या कठीण परिश्रमाने कार्यक्रम यशस्विरित्या संपन्न करण्यात आला.










