तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आणि बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

29

मौदा तालुक्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा तसेच तालुकास्तरीय बालविज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला.

कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून पंचायत समिती मौदाचे सभापती श्री. स्वप्निलजी श्रावणकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी किरण चिनकुरे, परीक्षक मनीष मोहरिल आणि अमित ढगे शिक्षक नानाजी जोशी विद्यालय शहापूर ,विस्तार अधिकारी(शिक्षण)संकेत मरसकोल्हे आणि रामेश्वर भक्तावर्ती, केंद्र प्रमुख श्री.राजू आंबिलकर , रुस्तम मोटघरे, शिल्पा सुर्यवंशी, अनिल पत्रे, अरविंद भिवगडे, निर्मला मस्कर तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, केंद्रस्तरांवर विजयी चमूंचे मुख्याध्यापक, शिक्षक,विशेष शिक्षक,साधन व्यक्ती,विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकेत मरसकोल्हे विस्तार अधिकारी(शिक्षण)यांनी केले.कार्यक्रमप्रसंगी परीक्षक मनीष मोहरील तसेच अमित ढगे यांनी लोकनृत्य,नक्कल,अभिनय या विषयांवर मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी रामेश्वर भक्तवर्ती यांनी आपल्या मार्गदर्शनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. मा.सभापती श्री. स्वप्निलजी श्रावणकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यांनी विजयी विद्यार्थ्याचे कौतुक केले तसेच शुभेच्छा दिल्या. बोरगाव केंद्रातील विद्यार्थ्यांनी केंद्राचे चषक प्राप्त करीत केंद्राचे नाव उंचावले. कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रमोद रावणे यांनी केले. आभारप्रदर्शन गटशिक्षणाधिकारी किरण चिनकुरे यांनी केले ज्यात संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले तसेच सर्व विजयी चमुंना तसेच विद्यार्थ्यांना विभागस्तरावरसुध्दा विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली.